Lok Sabha Election Voting Live : 91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 07:15 AM2019-04-11T07:15:29+5:302019-04-11T18:45:22+5:30

Lok Sabha Election Voting Live : लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे.

Lok Sabha Election Voting Live : 91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद | Lok Sabha Election Voting Live : 91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद

Lok Sabha Election Voting Live : 91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद

Next

Lok Sabha Election Voting Live : नवी दिल्ली - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.  

LIVE

Get Latest Updates

07:39 PM

पाहा देशभरात पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती मतदान झाले.



 

06:34 PM

देशात अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बिहार-50.26 टक्के, तेलंगणा-60.70 टक्के, मेघालय-62 टक्के, उत्तर प्रदेश- 59.77 टक्के, मणिपूर-78.20 टक्के, लक्षद्वीप - 65.9 टक्के, आसाम -68 टक्के मतदान पार पडले  



 

05:58 PM

गडचिरोलीमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा गोळीबार

गडचिरोलीमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा गोळीबार, धानोरानजीक दुपारी 4 च्या सुमारास घटना घडली. गोळीबारात कोणीही जखमी नाही.  



 

05:30 PM

पश्चिम बंगालमध्ये वयोवृद्ध महिलांनीही बजावला मतदानाचा हक्क



 

04:58 PM

आंध्र प्रदेशमध्ये दुपारी 3 पर्यंत 55 टक्के मतदान

आंध्र प्रदेशमध्ये दुपारी 3 पर्यंत 55 टक्के मतदान, अरुणाचल प्रदेशात 50.87 टक्के तर सिक्कीममध्ये 55 टक्के मतदान झाले



 

04:51 PM

जम्मू काश्मीरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 46.17 टक्के मतदान



 

04:50 PM

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.13 टक्के मतदान 

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.13 टक्के मतदान झाले आहे. 



 

 

 

04:33 PM

बिहारमध्येही दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान

बिहार राज्यातील औरंगाबाद येथे दुपारी 3 वाजेपर्यंत 38.50 टक्के, गया याठिकाणी 44 टक्के, नावडा येथे 43 टक्के तर जामुई येथे 41.34 टक्के मतदान झाले. 



 

04:19 PM

आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रात राडा

आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रात राडा झाला. श्रीनिवासपुरम गावातील मतदान केंद्रात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  



 

 

04:14 PM

मिझोरममध्ये तीन वाजपर्यंत 55.20 टक्के मतदान

मिझोरममध्ये तीन वाजपर्यंत 55.20 टक्के मतदान झाले. तर, त्रिपुरामध्ये 68.65 टक्के आणि प.बंगालमध्ये 69.94 टक्के मतदान झाले.



 

03:56 PM

 उत्तर प्रदेशात तीन वाजेपर्यंत 50.86 टक्के मतदान 



 

03:06 PM



 

02:56 PM

सुरक्षा रक्षकांनी हवेत केला गोळीबार

शामली जिल्ह्यातील एका मतदान केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्याऱ्या लोकांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी केला हवेत गोळीबार.



 

02:18 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलं मतदान



 

 

01:53 PM



 

01:12 PM

बाबा रामदेव यांनी मतदानाचा हक्क बजावला

उत्तराखंडमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. 



 

12:56 PM

वायएसआरसीपी आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

आंध्रप्रदेशात वायएसआरसीपी आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.



 

12:32 PM

नक्षली भागात मतदारांचा उत्साह

छत्तीसगडमधील नक्षली भागामध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे.  याठिकाणी सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. 



 

12:26 PM

पवन कल्याण यांनी केलं मतदान

आंध्र प्रदेश : जनसेना प्रमुख पवन कल्याण मतदान करण्यासाठी विजयवाडा येथील चैतन्य शाळेत आले होते.  


 

12:20 PM

'मी खूप आशावादी आहे'

तेलंगना : खम्मम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार रेणुका चौधरी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्या म्हणाल्या,'मी या शर्यतीत जिंकेन अशी आशा आहे. मी खूप आशावादी आहे.'  



 

12:09 PM

तेलंगणा राष्ट्र समितीच्या कलवकुंतला कविता यांनी केलं मतदान

तेलंगणा: तेलंगणा राष्ट्र समितीच्या कलवकुंतला कविता यांनी निजामाबाद मतदारसंघातील पोथंगल मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.



 

 

11:53 AM

बनावट मतदान होत असल्याचा भाजपा उमेदवाराचा आरोप

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे भाजपाचे उमेदवार संजीव बालियान यांनी त्यांच्या मतदारसंघात बनावट मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. मतदानासाठी बुरखा घालून आलेल्या महिलांची पडताळणी न करताच त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रात पाठवले जात आहे, त्यामुळे बनावट मतदान होत असल्याचा आरोप संजीव बालियान यांनी केला आहे. तसेच, याकडे लक्ष दिले नाही तर पुन्हा मतदान घेण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



 

11:45 AM

जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु आहे.



 

11:43 AM

सर्वानंद सोनोवाल मतदानाचा हक्क बजावला

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.



 

10:52 AM

दंतेवाडामध्ये कडोकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान

छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये कडोकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु आहे. यावेळी मतदानासाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या भागात नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भाजपा आमदारासह चार पोलीस शहीद झाले होते. 



 

10:48 AM



 

10:47 AM

नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील 220 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.



 

10:14 AM

असदुद्दीन ओवेसी यांनी बजावला मतदानाचा हक्क

हैद्राबादमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी  यांनी मतदान केले.



 

09:59 AM



 

09:58 AM

मधुसुदन गुप्तान ईव्हीएम तोडली

आंध्र प्रदेशातील जनसेनाचे उमेदवार मधुसुदन गुप्तान यांनी ईव्हीएम तोडली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.   



 

09:31 AM

नागालँडमध्ये नऊ वाजेपर्यंत 21 टक्के मतदान



 

09:16 AM



 

09:16 AM

त्रिवेंद्र सिंग रावत यांनी मतदानाचा हक्क बजावला

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत मतदानाचा हक्क बजावताना...



 

09:11 AM

92 वर्षीय मतदाराने केले मतदान

92 वर्षीय डी. एन. संघानी यांनी आपल्या मुलगा आणि सुनेसह मतदान केले. 



 

08:53 AM

जगनमोहन रेड्डी यांनी केले मतदान 

वायएसआर काँग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मतदान केले. 



 

08:47 AM

पश्चिम बंगालमध्ये मतदान करताना नागरिक.



 

08:46 AM

हरिश रावत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी मतदानाचा हक्क बजावला.



 

08:43 AM

उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केले मतदान

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश निशांक यांनी डेहराडूनमध्ये मतदान केले. 



 

08:41 AM

ढोल वाजवून मतदारांचे स्वागत

उत्तरप्रदेशातील बागपत मतदासंघातील एका मतदारसंघात मतदारांचे ढोल वाजवून स्वागत करताना विद्यार्थी. 



 

08:35 AM

चंद्राबाबू नायडू यांनी केले मतदान

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. 



 

08:33 AM

उत्तराखंडमध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तराखंडमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



 

08:30 AM

जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान

जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील मतदान केंद्रावर पोलिसांकडून  कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 



 

08:26 AM

महाराष्ट्रात पहिल्या टप्यातील मतदान

लोकसभान निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्यातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दरम्यान, गडचिरोली भागातील अलापल्ली गावात मतदान करताना नागरिक. 



 

07:27 AM

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा, नागरिकांमध्ये मतदानचा उत्साह



 

Web Title: Lok Sabha Election Voting Live : 91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.