Lok Sabha Election 2019: तृणमूल काँग्रेसकडून पाच बंगाली तारेतारकांना लोकसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:29 AM2019-03-15T04:29:03+5:302019-03-15T04:29:45+5:30

निवडणूक झाली वलयांकित; दोन जण राजकारणात नवखे

Lok Sabha Election 2019: Five Bangladeshi stars from Trinamool Congress for Lok Sabha election | Lok Sabha Election 2019: तृणमूल काँग्रेसकडून पाच बंगाली तारेतारकांना लोकसभेची उमेदवारी

Lok Sabha Election 2019: तृणमूल काँग्रेसकडून पाच बंगाली तारेतारकांना लोकसभेची उमेदवारी

Next

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी मिमी चक्रवर्ती, मुनमून सेन आदी पाच चित्रपट तारेतारकांना लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली असून त्यातील दोघे तर राजकारणात अगदीच नवखे आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांतही तृणमूल काँग्रेसने रिंगणात उतरविलेले पाचही चित्रपट कलाकार विजयी झाले होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी २००९ सालापासून तारेतारकांना उमेदवारी देण्यास सुरूवात केली. दाक्षिणात्य राज्यांमध्ये कलाकारांनी राजकारणाचा आखाडा गाजविणे ही काही नवलाईची गोष्ट नाही पण तेच लोण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आणले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २००९च्या निवडणुकीत १९ व २०१४च्या निवडणुकांत ३४ जागा जिंकल्या होत्या. राज्यात तृणमूल काँग्रेसच्या होणाऱ्या प्रचारसभांमध्ये अनेक नामवंत कलाकार हजेरी लावतात. ममतांचे विचार ऐकण्यासाठी व त्या कलाकारांना पाहण्यासाठीही एकच गर्दी उसळते.

तृणमूल काँग्रेसतर्फे जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या मिमी चक्रवर्ती या लोकप्रिय नायिका असल्या मात्र राजकारणात अगदी नवख्या आहेत. त्यांची उमेदवारी अनेकांना सुखद धक्का देऊन गेली. आणखी एक बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसिरहाट या लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. या दोघांबरोबरच सध्या खासदार असलेले व लोकप्रिय कलाकार दीपक अधिकारी, शताब्दी रॉय, मुनमून सेन हे तिघेही पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढविणार आहेत.

‘या' दोघांचे तिकीट कापले
कलाकारांना उमेदवारी देताना तृणमूल काँग्रेसने विद्यमान खासदार तापस पाल, संध्या रॉय यांना पुन्हा तिकीट दिलेले नाही. रोझ व्हॅली चीट फंड घोटाळाप्रकरणी तापस पाल यांना सीबीआयने २०१६ साली अटक केली होती व त्यांची नंतर जामिनावर मुक्तता झाली.

Web Title: Lok Sabha Election 2019: Five Bangladeshi stars from Trinamool Congress for Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.