'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:02 PM2019-05-14T12:02:13+5:302019-05-14T12:18:23+5:30

लहानपणापासूनच आपल्याला तंदरुस्त राहणे आवडते. त्यामुळे फोटो सेशन करण्याची देखील आवड निर्माण झाली. त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच योग्य ड्रेसकोड निवडण्यासाठी प्रयत्नशील राहते, असं रिना यांनी सांगितले.

Lok Sabha Election 2019 election duty officer reena dwivedi real life story | 'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर?

'लिंबू कलरची साडी' पुन्हा हिट, 'त्या' महिला पोलिंग ऑफिसरला सिनेमाची ऑफर?

googlenewsNext

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लिंबू कलरची साडी परिधान केलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स ऐपवर देखील लिंबू कलरवाल्या महिलेचीच चर्चा आहे. या महिलेचे नाव रिना द्विवेदी असून त्यांचे राहणीमान एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणेच आहे.

रिना मुळच्या उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रिना यांनी त्यांच्या आयुष्याविषयीचे अनेक खुलासे केले. रिना यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्यांच्या आयुष्याबद्दल वाचल्यानंतर सर्वांनाच धक्का बसत आहे.

लखनौमधील पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायकपदावर काम करत असलेल्या रिना द्विवेदी यांनी सांगितले की, २००४ मध्ये पीडब्ल्यूडी विभागात काम करत असलेले वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी त्यांचा झाला होता. मात्र २०१३ मध्ये संजय यांचं निधन झालं. मात्र नवऱ्याच्या निधनानंतर रिना यांनी धीर सोडला नाही. रिना यांनी पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. रिना यांना १३ वर्षाचा मुलगा आहे.

 

लहानपणापासूनच आपल्याला तंदरुस्त राहणे आवडते. त्यामुळे फोटो सेशन करण्याची देखील आवड निर्माण झाली. त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच योग्य ड्रेसकोड निवडण्यासाठी प्रयत्नशील राहते, असं रिना यांनी सांगितले.

चित्रपटात काम करण्याची ऑफर नाकारली

मी अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. एवढच नव्हे तर मला भोजपुरी चित्रपटात काम करण्याची ऑफर देखील मिळाली होती. मी ती ऑफर नाकारली होती. मात्र यापुढे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यास आपण नक्कीच विचार करू, असंही रिना म्हणाल्या. रिना यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

 

लोक सेल्फी काढण्यासाठी करतायत आग्रह

सोशल मीडियावर आपले फोटो व्हायरल झाल्यापासून अनेकजन आपल्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांचे फोन येत आहेत. अनेकदा हे चांगलं वाटतं. परंतु यामुळे अडचणी देखील निर्माण होत आहेत. निवडणुकीच्या कामासाठी रिना मोहनलालगंजमधील नगराम मतदान केंद्रावर तैनात होत्या. त्यांच्या मतदान केंद्रावर ७० टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होण्याच्या घटनेला कुटुंबियांनी सकारात्मकतेने घेतल्याचे रिना यांनी सांगिलते.

Web Title: Lok Sabha Election 2019 election duty officer reena dwivedi real life story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.