पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 06:03 PM2019-04-13T18:03:39+5:302019-04-13T18:18:24+5:30

शरद पवारांच्या  कुटंबात पक्षाच्या श्रेय वरून वाद सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदेंची खिल्ली उडवली आहे.

lok sabha election 2019 Dhananjay Munde sharp attack on Prime Minister Narendra Modi | पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

पवार साहेबाच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. नरेंद्र मोदींनीशरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उस्मानाबादच्या सभेत चांगलाच समाचार घेतला.

शरद पवारांच्या  कुटंबात पक्षाच्या श्रेय वरून वाद सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदेंची खिल्ली उडवली आहे. उस्मानाबाद येथील महाआघाडीचे उमदेवार राणाजगजित सिंह पाटील प्रचारार्थ बोलत होते.

देशाच्या प्रमुख आणि पंतप्रधान यांनी एखाद्या नेत्याचा घरापर्यंत जाऊन टीका करावी, एवढी वाइट वेळ देशाच्या पंतप्रधानावर येणे याचाच अर्थ मोदींना समोर पराभव दिसत आहे. मोदी साहेब तुम्ही आमच्या नेतृत्वच्या घरापर्यंत आलात. माझा सारखा एखादा तुमच्या घरात घुसला व विचारल. पवार साहेबांच्या घराच जाऊ द्या हो मोदी साहेब, तेवढ जशोदाबेनच काय झाल सांगाना. अश्याप्रकारे, धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र  मोदींवर टीका केली.

तुम्ही घेतलेले निर्णय काय आहे त्यावर तुम्ही का बोलत नाही. जीएसटीचा काय फायदा झाल, नोट बंदीचा काय फायदा झाला, मुद्राच काय झाले. कारगिल युद्ध झाले तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांनी कधी शहीद जवानांवर मत माघीतले नाही. मात्र तुम्हाला, शहीद जवानांच्या नावावर मत मागायला लाज कशी वाटत नाही असा टोला यावेळी धनंजय मुंडेंनी लागवला.

 

Web Title: lok sabha election 2019 Dhananjay Munde sharp attack on Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.