Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 04:55 PM2019-05-23T16:55:38+5:302019-05-23T17:05:43+5:30

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली.

Lok Sabha Election 2019: Chowkardar Chowk's slogan is wrong Congress says | Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजयाची नोंद करताना २०१४ मधील स्वत:ची कामगिरी आणखी उंचावली आहे. यात काँग्रेसची वाताहत झाल्याचे चित्र आहे. भाजप प्रणीत एनडीएने बहुमताकडे आगेकूच केली आहे. तर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे.

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली. काँग्रेसला केवळ ५५ जागा मिळाल्या. सध्या काँग्रेसच्या मुख्यालयात शांतता पसरली आहे. आधीच एक्झिट पोलने आधीच एनडीएला बहुमत दाखवले होते.

सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देण्यात आलेला 'चौकीदार चोर'चा नारा सपशेल फसल्याचे काँग्रेसकडून मान्य करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसला एवढ्या दारुण पराभवाची कल्पना नव्हती. पक्षाने एकत्र होऊन लढणे आवश्यक होते. तर काँग्रेसला मजबूत स्थितीत आणता आले असते, असंही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राफेलच्या मुद्दावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले होते. तसेच 'चौकीदार चोर है'चा नारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने 'मै भी चौकीदार'ची मोहिम उभारली होती. मात्र 'चौकीदार चोर'ची काँग्रेसची मोहिम फसली आणि मोदींची 'मै भी चौकीदार चोर' मोहिम चांगलीच हिट झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Chowkardar Chowk's slogan is wrong Congress says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.