राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:13 AM2019-05-10T11:13:01+5:302019-05-10T11:26:58+5:30

गंगा, नर्मदेला साफ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत आम्ही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यात काँग्रेसचे सरकार आणले. मात्र नरेंद्र मोदींनी सर्वांना धोका दिल्याचे, त्यामुळे काँग्रेसचे खासदार निवडून देणार असल्याचे कॉम्प्युटर बाबांनी सांगितले.

Lok Sabha Election 2019 Change Chaukidaar says Computer Baba | राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार

राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार

Next

भोपाळ - मध्य प्रदेशातील कॉम्प्युटर बाबा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार नाही, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. तसेच 'राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार' अशी घोषणा कम्प्युटर बाबांनी दिली आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मध्य प्रदेशात काँग्रेस १५ जागा जिंकणार, असा दावा कॉम्प्युटर बाबा यांनी केला आहे. काँग्रेसला मोठं यश मिळणार आहे. काँग्रेसच्या विजयासाठी अंतर्गत काम सुरू आहे. गंगा, नर्मदेला साफ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत आम्ही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यात काँग्रेसचे सरकार आणले. मात्र नरेंद्र मोदींनी सर्वांना धोका दिल्याचे, त्यामुळे काँग्रेसचे खासदार निवडून देणार असल्याचे कॉम्प्युटर बाबांनी सांगितले.

निवडणुकीच्या निकालानंतर आपण पुन्हा बोलू असे सांगत देशाने नरेंद्र मोदी यांच्याएवढा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान कधीच होणार नाही. संताची घोषणाच आहे, 'राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार' असंही कॉम्प्युटर बाबा म्हणाले.

मध्य प्रदेशातून काँग्रेसचे १५ खासदार लोकसभेत पाठवायचे आहे. ते जाणारच आहेत. ते १५ खासदार कम्प्युटर बाबांमुळे जिंकणार नसून त्यांच्या कर्मांनी जिंकणार असल्याचे बाबांनी सांगितले. विजयासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना ३३ टक्के मते घ्यावे लागणार आहे. ३० टक्के मते उमेदवार घेतलील तर वरच्या तीन टक्के मतांची जबाबदारी साधू संतांची असल्याचे कॉम्प्युटर बाबांनी सांगितले.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Change Chaukidaar says Computer Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.