राहुल गांधींचे 'डीएनए' खराब ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:17 PM2019-05-21T12:17:12+5:302019-05-21T12:36:11+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला २ दिवसांच वेळ शिल्लक राहिला आहे. त्याआधी आलेल्या विविध एजन्सींचे एक्झिट पोलमुळे एनडीए आणि भाजपचे नेते उत्साहाच्या भरात वायफळ विधाने करू लागले आहेत.

lok sabha election 2019 BJP minister's controversial statement | राहुल गांधींचे 'डीएनए' खराब ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

राहुल गांधींचे 'डीएनए' खराब ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Next

मुंबई - भाजप नेत्यांची विधाने भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरली असल्याची पहायला मिळाले. मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना सुद्धा भाजप नेत्यांची वादग्रस्त विधाने काही थांबता थांबेना. हरियाणामधील भाजप सरकारमध्ये असलेले कॅबिनेट मंत्री राम बिलास शर्मा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधीचे 'डीएनए' खराब असल्याचे अश्लील विधान शर्मा यांनी केले आहे. राहुल गांधीच्या संबधीत प्रश्नाला उत्तर देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला २ दिवसांच वेळ शिल्लक राहिला आहे. त्याआधी आलेल्या विविध एजन्सींचे एक्झिट पोलमुळे एनडीए आणि भाजपचे नेते उत्साहाच्या भरात वायफळ विधाने करू लागले आहेत. कॅबिनेट मंत्री शर्मा हे राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे इंदिरा गांधींना देवी म्हणून उच्चारत होते . मात्र, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येकवेळी चोर म्हणतात. हा वाईट 'डीएनए'चा प्रभाव आहे. असे वादग्रस्त विधान शर्मा यांनी केले.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार. हरियाणामधील १० जागांवर पूर्णपणे भाजपलाच विजय मिळणार आहे. देशात ३५३ खासदार भाजपचे होणार आहे. निकालाचे आकडे येताच कॉंग्रेसचे नेते घरात लपून बसतील असा दावा सुद्धा शर्मा यांनी यावेळी केला.

Web Title: lok sabha election 2019 BJP minister's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.