अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 04:49 PM2019-05-04T16:49:34+5:302019-05-04T17:32:53+5:30

आपल्या प्रत्येक भाषणात आणि पत्रकार परिषदेत राहुल गांधी हे अनिल अंबानींवर टीका करताना पहायला मिळतात. देशातील गरीब जनतेचा पैसा मोदींनी अंबानीच्या खिशात घातल्याचा आरोप सुद्धा याआधी राहुल गांधींनी केला आहे.

lok sabha election 20019 Rahul Gandhi The target  Anil Ambani | अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयार : राहुल गांधी

अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयार : राहुल गांधी

Next

नवी दिल्ली - मी खुलं आव्हान देतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चर्चेला बसावं. अनिल अंबानी यांचे घर वगळता, ते सांगतील त्या ठिकाणी येऊन मी चर्चा करायला तयार असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लागवला. काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्या प्रत्येक भाषणात आणि पत्रकार परिषदेत राहुल गांधी हे अनिल अंबानींवर टीका करताना पहायला मिळतात. देशातील गरीब जनतेचा पैसा मोदी यांनी  अंबानीच्या खिशात घातल्याचा आरोप सुद्धा याआधी राहुल गांधींनी केला होता. तर, राफेल कराराची चौकशी करण्याची मागणीही अनेक वेळा राहुल यांनी केली आहे. मी करत असलेल्या आरोपाच खंडन करण्यासाठी मोदींनी हवे तिथे चर्चेला बोलवावे, मात्र अनिल अंबानी यांचे घर सोडून असा टीकात्मक आव्हान राहुल यांनी दिले आहे.

मोदींनी देशाच्या जनतेच्या पैशातून अनिल अंबानी यांना ३० हजार कोटीचे फायदा करून दिले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी राहुल गांधी यांनी केला. मी करत असलेले आरोप खोटे आहे असे सांगणारे मोदींनी माझ्या सोबत दहा मिनिटं का होईना चर्चेला बसावं असे राहुल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. त्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी राहुल गांधी यांनी सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Web Title: lok sabha election 20019 Rahul Gandhi The target  Anil Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.