लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:56 AM2018-10-22T04:56:21+5:302018-10-22T04:56:37+5:30

रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे.

Loco pilot said, "I'm not wrong | लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

Next

अमृतसर : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. ते पाहताच गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा स्पीड लक्षात घेता गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.
मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली. तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाºयांनाही माहिती दिली, असेही या कुमार यांनी म्हटले
>दोन दिवसांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत
रेल्वेरूळावर वारंवार ठिय्या मारून निदर्शने करणाºया संतप्त रहिवाशांना हटविण्यात पोलिसांना अखेर रविवारी यश आले. त्यामुळे दोन दिवसांनी रेल्वेवाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाºया डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे.

Web Title: Loco pilot said, "I'm not wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.