Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:07 AM2018-07-11T11:07:40+5:302018-07-11T11:09:12+5:30

देशाच्या 'भविष्या'वर शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ

Locals, school children risk their lives crossing collapsed bridge | Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

Next

खेडा: शिक्षणामुळे भवितव्य घडतं असं म्हणतात. मात्र देशाचं भविष्य असलेल्या मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील खेडा येथे घडत आहे. पूल कोसळून दोन महिने होऊनही प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जातात आणि शाळेतून घरी परततात. नायका आणि भेराई गावांना जोडणारा पूल कोसळल्यानं विद्यार्थ्यांना दररोज जीवावर उदार होऊन शाळेत जावं लागतं. याबद्दल ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे विनंती- अर्ज केले. मात्र प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही. 'हा पूल नसल्यानं आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आधी आम्हाला केवळ 1 किलोमीटर प्रवास करावा लागायचा,' अशी व्यथा एका ग्रामस्थानं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली. 





या ठिकाणी लवकरच नवा पूल उभारण्यात येईल. त्याचं काम तातडीनं सुरू करण्यात येईल, अशी माहिती खेडाचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी दिली. 'पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल. सध्या पाऊस असल्यानं पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं नाही,' असं पटेल यांनी सांगितलं. 

Web Title: Locals, school children risk their lives crossing collapsed bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.