LIVE TICKETS FOR WAIT LIST LIST! Relief for women passengers by rail decision | प्रतीक्षा यादीमधील महिलांना थेट तिकिटे! रेल्वेच्या निर्णयाने महिला प्रवाशांना दिलासा
प्रतीक्षा यादीमधील महिलांना थेट तिकिटे! रेल्वेच्या निर्णयाने महिला प्रवाशांना दिलासा

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील शिल्लक जागा महिलांसाठी प्राधान्याने आरक्षित ठेवल्या जातील. महिलांचे प्रमाण कमी असल्यास त्या ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जातील. रेल्वेने जारी केलेल्या या परिपत्रकामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या प्रक्रियेमुळे या शिल्लक जागा महिलांना उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. यामागचे मुख्य कारण म्हणजे आरक्षणाची अंतिम यादी तयार होईपर्यंत हे आरक्षण नोंदणीसाठी खुले असे. यादी तयार झाल्यानंतर या जागा सर्वांसाठी खुल्या होत, परंतु रेल्वेने आता सर्व व्यवस्थापकांना परिपत्रक पाठवून, महिलांच्या शिल्लक जागा भरण्यासाठी सध्या वापरले जाणारे तर्कशास्त्र बदलण्याचे आदेश दिले आहेत. आता शिल्लक जागा थेट प्रतीक्षा यादीतील महिलांना दिल्या जाणार आहेत.
ज्येष्ठांनाही लाभ-
सध्या रेल्वेत स्लीपर क्लास श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालच्या ६ जागा ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेली महिला, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असतात. राजधानी, दुरांतो, तसेच पूर्णपणे वातानुकूलित, तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये खालच्या ४ जागा या वर्गासाठी आरक्षित ठेवलेल्या असतात.


Web Title:  LIVE TICKETS FOR WAIT LIST LIST! Relief for women passengers by rail decision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.