ऐकावे ते नवलच! कबुतराचा बसमधून विनातिकीट प्रवास, कंडक्टरला मिळाला मेमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 04:23 PM2017-09-10T16:23:01+5:302017-09-10T16:23:11+5:30

दररोज कितीतरी प्रवासी बस आणि ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करतात. पण, कबुतराने विनातिकीट प्रवास केल्यामुळे कंडक्टरला चक्क मेमो मिळाला आहे.

Listen to that! Unique travel by the cottage bus, the conductor received memo | ऐकावे ते नवलच! कबुतराचा बसमधून विनातिकीट प्रवास, कंडक्टरला मिळाला मेमो

ऐकावे ते नवलच! कबुतराचा बसमधून विनातिकीट प्रवास, कंडक्टरला मिळाला मेमो

Next

चेन्नई, दि. 10 - दररोज कितीतरी प्रवासी बस आणि ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करतात. पण, कबुतराने विनातिकीट प्रवास केल्यामुळे कंडक्टरला चक्क मेमो मिळाला आहे. तामीळनाडूमध्ये ही घटना घडली असून राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने कंडक्टरला मेमो बजावला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री उशिरा बसमधून एक प्रवासी आपल्या कबुतरासोबत हारूर ते इल्लावाडी असा प्रवास करत होता. तब्बल ८० प्रवासी असलेली ही बस हारूरमध्ये दाखल होताच तिकीट तपासनीस बसमध्ये चढला. प्रवाशांची तिकीट तपासणी सुरू असताना एका प्रवाशाकडे कबुतर असल्याचं या तपासनीसाच्या लक्षात आलं. तेव्हा या कबुतराचं तिकीट काढलंय का? अशी विचारणा त्याने संबंधित प्रवाशाला केली. प्रवाशाने तपासनीसाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या विनातिकीट कबुतराविषयी तपासनीसाने कंडक्टरला जाब विचारला. त्यावर कंडक्टर म्हणाला की, हा प्रवाशी बसमध्ये चढला त्यावेळी त्याच्याकडे कबुतर नव्हते. कंडक्टरच्या या उत्तराने तपासनीस समाधानी झाला नाही. त्यामुळे त्याला मेमो देण्यात आला.

यावेळी तिकीट तपासनीसाने एका नियमाचा हवाला देऊन सांगितलं की, बसमध्ये प्राणी आणि पक्षांसाठीही तिकीट अनिवार्य आहे. पण हा नियम एखादा प्रवासी 30 पेक्षा जास्त प्राणी अथवा पक्षांना घेऊन प्रवास करत असल्याचं लागू होतो. एका कबुतरासाठी हा नियम लागू होत नसल्याचं, महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

Web Title: Listen to that! Unique travel by the cottage bus, the conductor received memo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.