जीवघेणी अंधश्रद्धा! उपचाराच्या नावाखाली चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 09:26 AM2018-03-20T09:26:51+5:302018-03-20T09:28:45+5:30

उपचार करण्याच्या नावाखाली एका चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाने चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Life is superstition! Hot iron shots in the name of treatment under four months of chimney | जीवघेणी अंधश्रद्धा! उपचाराच्या नावाखाली चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाचे चटके

जीवघेणी अंधश्रद्धा! उपचाराच्या नावाखाली चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाचे चटके

Next

जयपूर : उपचार करण्याच्या नावाखाली एका चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाने चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील भिलवाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणामुळं सर्वच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 

रामाखेडा गावात राहणाऱ्या चार महिन्यांच्या नंदिनीची प्रकृती बिघडल्याने तिला भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांना नंदिनीच्या पोटावर गरम लोखंडाने चटके दिल्याचं उघडकीस आल्याचे भिलवाडातील कारोई पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले. 

पीडित नंदिनीला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्याऐवजी गरम लोखंडाने पोटावर चटके देण्यात आले. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा आहे. उपचार करण्याच्या नावावार पीडित चिमुकलीला गरम चटके देण्यात आले आहेत. महात्मा गांधी रुग्णालयाचे डॉक्टर ओ पी आगल यांनी सांगितले की, पीडित नंदिनीला निमोनिया झाला आहे. तिच्यावर उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धाळुंनी गरम लोखंडाने चटके दिले.

Web Title: Life is superstition! Hot iron shots in the name of treatment under four months of chimney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.