देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', 100 किलो सोनं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:44 PM2018-07-17T12:44:07+5:302018-07-17T12:45:18+5:30

तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे.

The largest forage in the country, 100 kg of gold confiscated | देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', 100 किलो सोनं जप्त

देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', 100 किलो सोनं जप्त

Next

मदुराई - तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यासोबत 163 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीतून मिळालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठा संपत्ती असल्याचे बोलले जाते. एका बांधकाम व्यावसायिक कंपनीवर ही धाड टाकण्यात आली आहे.

मुदराईतील एसपीके कंपनीच्या वेगवेगळ्या 22 ठिकाणी प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. अरुप्पुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील कंपनीच्या कार्यालयात सोमवारी ही धाड टाकण्यात आली. या कंपनीकडून सरकारच्या महामार्गांचे कंत्राट घेण्यात येते. आत्तापर्यंत या धाडीत अंदाजे 100 किलो सोनं आणि 163 कोटी रुपयांची रोकड (अंदाजे) जप्त करण्यात आली असून धाडीची कारवाई अद्यापही सुरुच असल्याचे प्राप्तीकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील ही आजपर्यंतची सर्वाच मोठी जप्ती असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुरक्षित एका मोठ्या गाडीत ठेवल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, यापूर्वी नोटबंदीनंतर 2016 मध्ये प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत 110 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. 

163 कोटींची रोख रक्कम -



 

 

Web Title: The largest forage in the country, 100 kg of gold confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.