‘अर्थव्यवस्थेत पुरेशा रोजगारनिर्मितीचाच अभाव’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:56 AM2018-12-15T05:56:30+5:302018-12-15T05:57:06+5:30

गेल्या पाच वर्षांत भारताच्या वित्तीय स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा टोला राजन यांनी लगावला.

'Lack of adequate employment generation in the economy' | ‘अर्थव्यवस्थेत पुरेशा रोजगारनिर्मितीचाच अभाव’

‘अर्थव्यवस्थेत पुरेशा रोजगारनिर्मितीचाच अभाव’

Next

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोजगार निर्माण होत नसल्याची टीका करीत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. गेल्या पाच वर्षांत भारताच्या वित्तीय स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा टोलाही राजन यांनी लगावला.

ते येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, भारताने आपली जीडीपी वृद्धी ७ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवणे आवश्यकच आहे. देशात स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असतानाही आपली निर्यात त्या तुलनेत वाढवता आलेली नाही. भारतातील शेती क्षेत्र अजूनही मोठ्या संकटात असल्याच ेस्पष्टपणे दिसून येत आहे.


 

Web Title: 'Lack of adequate employment generation in the economy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.