Kisan Kranti Padyatra : सरकारनं सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे - अजित नवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:16 PM2018-10-02T13:16:04+5:302018-10-02T13:16:23+5:30

Kisan Kranti Padyatra : गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य किसान सभेच सरचिटणीस अजित नवले यांनी दिली आहे. 

Kisan Kranti Padyatra : Government has lost the moral right to live on power - Ajit Navale | Kisan Kranti Padyatra : सरकारनं सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे - अजित नवले

Kisan Kranti Padyatra : सरकारनं सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे - अजित नवले

Next

मुंबई -  गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य किसान सभेच सरचिटणीस अजित नवले
यांनी दिली आहे.  किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. 

सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या,अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचा वारंवार विश्वासघात करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे. वारंवार होणारा विश्वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा  शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लॉंग मार्च काढणार आहेत, असेही नवले यांनी पत्रक प्रसिद्ध करत सांगितले आहे. नवी दिल्लीच्या चारही बाजूने चार लॉंग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढ्याची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी व विश्वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Web Title: Kisan Kranti Padyatra : Government has lost the moral right to live on power - Ajit Navale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.