केरळ सुदृढ, उत्तर प्रदेश मात्र आजारी; संपूर्ण देशाचा आरोग्य निर्देशांक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:38am

देशामध्ये केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वाधिक असून, याबाबत मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वाधिक असून, याबाबत मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य आहे. केरळमध्ये आरोग्य निर्देशांक ७६.५५ व उत्तर प्रदेशात ३३.६९ इतका आहे. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य निर्देशांकाची स्थिती गेल्या काही वर्षांत काहीशी सुधारली असली तरी यासंदर्भात मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत अजूनही हे राज्य शेवटच्या क्रमांकावरच आहे. आकाराने मोठ्या राज्यांमध्ये केरळनंतर पंजाब, तामिळनाडू व गुजरात या राज्यांचा आरोग्य निर्देशांक उत्तम आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, ओदिशा या राज्यांत मात्र आरोग्य निर्देशांकाची प्रकृती गंभीर अवस्थेत आहे. मोठ्या राज्यांमध्ये झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मिर येथील आरोग्य निर्देशांकामध्ये वृद्धी होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य निर्देशांकाची स्थिती नेमकी काय आहे याबाबत नीती आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही. देशातील छोट्या राज्यांपैकी मिझोरामचा आरोग्य निर्देशांक सर्वात चांगला असून त्यानंतर मणिपूर व गोवा या राज्यांचा क्रमांक लागतो. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, देशामध्ये विविध राज्यांत आरोग्यविषयक स्थिती कशी आहे याबाबत आरोग्य निर्देशांक अहवालातून माहिती मिळते. ज्या राज्यांत आरोग्यविषयक स्थिती उत्तम नाही ती सुधारण्यासाठी त्या राज्यांना इतर राज्यांनी मदत करण्याची प्रेरणाही अशा अहवालातून मिळते. तीन निकषांच्या आधारे झाले सर्वेक्षण आरोग्य निर्देशांकाठी मोठी राज्ये, छोटी राज्ये, केंद्रशासित प्रदेश असे तीन गट तयार करण्यात आले. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यविषयक स्थिती, सरकारी यंत्रणांचा कारभार व आरोग्यविषयक माहिती अशा तीन निकषांच्या आधारे अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला. नीती आयोगाने केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालाला जागतिक बँकेचे सहकार्य लाभले आहे.

संबंधित

‘स्मार्ट सिटी’बरोबरच ग्रामीण विकासाला प्राधान्य, ‘नीति आयोगा’कडे तज्ज्ञांच्या शिफारशी
कॅन्सरमुक्त भारतासाठी ‘विषमुक्त शेती अभियान’, नीती आयोगाच्या बैठकीत तज्ज्ञांचे मत 
अर्थसंकल्प निवडणुकांसाठी नसेल, सवंग लोकप्रियता नाही, निती आयोगाचे राजीव कुमार यांचे मत
अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब
देगलूरच्या शाळेत नीती आयोग साकारणार आधुनिक अटल प्रयोगशाळा

राष्ट्रीय कडून आणखी

लोकसभेच्या 'या' ४२९ जागा जिंकायच्या कशा?; मोदी-शहांना चिंता
अनंतनागच्या बिजबेहरामध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 6 नागरिक जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून गोळीबार सुरूच, 4 नागरिकांचा मृत्यू
धक्कादायक! पेन्शनसाठी त्यांनी पाच महिने आईचा मृतदेह लपवून ठेवला
तामिळनाडूत कॉपर प्लांटला मद्रास हायकोर्टाची स्थगिती, आतापर्यंत 11 जणांचा गेला जीव

आणखी वाचा