Kathua Rape Case :  जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या 9 मंत्र्यांनी दिले राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 10:36 PM2018-04-17T22:36:49+5:302018-04-17T22:36:49+5:30

कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असून, पीडीपीसह राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या 9 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Kathua Rape Case: 9 BJP ministers in Jammu and Kashmir resign | Kathua Rape Case :  जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या 9 मंत्र्यांनी दिले राजीनामे 

Kathua Rape Case :  जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या 9 मंत्र्यांनी दिले राजीनामे 

श्रीनगर - कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असून, पीडीपीसह राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या 9 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत. 

आता बुधवारी या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. त्यानंतर महबूबा यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. त्याआधी भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची संख्या 11 झाली आहे. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी आघाडीचे सरकार असून, कठुआ गँगरेप प्रकरणानंतर उद्योगमंत्री चंद्रप्रकाश गंगा आणि वनमंत्री चौधरी लाल सिंह यांनी राजीनामा दिला होता. या मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: Kathua Rape Case: 9 BJP ministers in Jammu and Kashmir resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.