शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:22 AM2017-11-23T04:22:24+5:302017-11-23T04:22:44+5:30

नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.

Kashmiri youths to get scholarships for weapons- Prakash Javadekar | शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

Next

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालयाने सांगितले की, जर कोणत्या तरुणावर गुन्हा नोंद नसेल, तो शिकला सवरलेला असेल व त्याला देशाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.
काश्मीर खोºयात नुकतेच दोन सुशिक्षित युवक अतिरेकी कारवायांनी प्रभावीत होऊन अतिरेकी गटाकडे गेले. अतिरेकी गटाची भाषा व वर्तनात फरक अनुभवास आला व चूक व बरोबर यातील फरकही समजल्यानंतर आपली चूक झाली याची जाणीव त्यांना झाली. नंतर ते दोघेही घरी परतले. यातील एक मुलगा १६ वर्षांचा होता. दुसरा तरूण माजिद इरशाद खान या फूटबॉलपटूने त्याच्या आईने केलेले आवाहन मान्य करून अतिरेकी गट सोडून दिला व कोणतेही हिंसक कृत्य न करता घरी परतला. त्याने पुढे शिक्षण घ्यायची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर त्याने पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्याची चर्चाही झाली बहुधा तो अर्ज करू शकणार नाही. मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालयातील अधिकाºयाने सांगितले की जर एखाद्याने गुन्हा केलेला नाही व त्याला शिकायचे आहे तर त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. तरूण अतिरेक्यांना सोडून परत येत आहेत हेच आमचे यश आहे. भ्रमनिरास झाल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येत आहेत.
गेल्या वर्षी ३,८२० स्वीकृत जागा होत्या, त्यापैकी २,२७२ तरुणांनी वेगवेगळी शिष्यवृत्ती मिळविली. या वर्षी जागांमध्ये जवळपास १,२०० ची वाढ केली गेली. या वर्षी जवळपास ३,४२० शिष्यवृत्ती दिल्या जातील. मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वर्षीच्या शिष्यवृत्तीला मान्यता दिली.
जावडेकर यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन शिष्यवृत्तीचा आढावा घेतला होता. त्यांनी आदेश दिला की, राज्यातील प्रत्येक पात्र युवक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकेल, यासाठी खेड्यापाड्यांत प्रचार करा. लाउडस्पीकरद्वारे ही योजना जाहीर करा.

Web Title: Kashmiri youths to get scholarships for weapons- Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.