काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खरा असेल तर मोदींनी उत्तर द्यावे - राहुल गांधी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:05 PM2019-07-23T16:05:24+5:302019-07-23T16:37:57+5:30

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वारस्येला आणि 1972 च्या शिमला समझौत्याला धोका दिला आहे'

kashmir issue pm modi betrayed indias interests must tell nation what transpired says rahul on trumps claim | काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खरा असेल तर मोदींनी उत्तर द्यावे - राहुल गांधी  

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खरा असेल तर मोदींनी उत्तर द्यावे - राहुल गांधी  

Next

नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे. यावरुन मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु झाला. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच, याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर पुरेसे नाही आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी ट्विटवरुन म्हटले आहे. 

राहुल गांधी म्हणाले, ''जर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खरा असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वारस्येला आणि 1972 च्या शिमला समझौत्याला धोका दिला आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर पुरेसे नाही आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले पाहिले."


दरम्यान, नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. 

'काश्मीरप्रश्नी मोदींनी ट्रम्प यांची 'मध्यस्थी' मागितलेली नाही; त्यांचा दावा तथ्यहीन!'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जो काही दावा केला आहे. तो चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीची कोणतीही मागणी केली नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत  सांगितले. तसेच, भारताकडून सतत सांगण्यात येत आहे की पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होणार आहे. ती फक्त द्विपक्षीय आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्दयावर चर्चा होऊ शकते. मात्र, त्यांच्याकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. शिमला आणि लाहोर समझौता ज्याप्रकारे झाला. त्याचप्रकारे पाकिस्तानसोबत प्रत्येक मुद्दा द्विपक्षीय चर्चेने सोडविला जाऊ शकतो, असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
 

Web Title: kashmir issue pm modi betrayed indias interests must tell nation what transpired says rahul on trumps claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.