दहावी नापास विद्यार्थ्याने अॅमेझॉनला घातला 1.3 कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 04:27 PM2018-03-12T16:27:45+5:302018-03-12T17:36:33+5:30

21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, आयपॉड, अॅपल घड्याळाचा समावेश आहे.

karnataka class 10 dropout dupes amazon of rs 1.3 crore | दहावी नापास विद्यार्थ्याने अॅमेझॉनला घातला 1.3 कोटींचा गंडा

दहावी नापास विद्यार्थ्याने अॅमेझॉनला घातला 1.3 कोटींचा गंडा

Next

बंगळुरु - दहावीमध्ये शिक्षण सोडलेल्या एका तरुणाने अॅमेझॉनला 1.3 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. बंगळुरुत रहाणारा हा तरुण एकदंत कुरिअर कंपनीमध्ये काम करत होता.  ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनकडून देण्यात आलेल्या टॅबद्वारे त्यानं हा घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

25 वर्षीय दर्शन एलियास ध्रुवने आपल्या मित्रांना अॅमेझॉनवरुन महागड्या वस्तू ऑर्डर करायला सागंत असे. त्यानंतर  त्या वस्तू पैसे ट्रांसफर न करता त्यांना पोहचवत असे. या घटनेबाबत चार तरुणांना 25 लाखांच्या सामनासह पोलिसांनी ताब्यत घेतले आहे. यामध्ये 21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, आयपॉड, अॅपल घड्याळाचा समावेश आहे. या सर्वसामानासोबतच चार महागड्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  दोन जण अद्याप फरार आहेत. 

काय म्हणाले पोलिस - 
हा फसवणूकीचा प्रकार सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये झाला आहे. तीन महिन्यांच्या डाटाची पडताळणी करताना अॅमेझॉनच्या आधिकाऱ्यांना दर्शनने केलेली फसवणूक समजली. त्यानंतर अॅमेझॉनने पोलिसांत त्याची तक्रार दाखल केली.  सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या सहा महिन्यांत अॅमेझॉनला चिकमंगळुरु शहरातून 4,604 ऑर्डर्स मिळाल्या होत्या. ही सर्व उत्पादने दर्शनने पोहचवली. एकदंत कुरिअर कंपनी आणि अॅमेझॉन यांच्यामध्ये भागीदारी होती,  दर्शन एकदंत कुरिअर कंपनीमध्य काम करत होता. 
हे प्रकरण आणखी पूर्णपण स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, दर्शनने कस्टमर्स पैसे भरत असलेल्या सिस्टममध्ये छेडछाड केली आहे. एसपी के. अन्नामलई यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, कार्ड स्वॉप करताना डुप्लिकेट पेमंट अलर्ट तयार केले होते. ज्यावेळी कस्टमर्स पैसे भरत असे त्यावेळी तो अलर्ट कंपनीला जात असे. 

Web Title: karnataka class 10 dropout dupes amazon of rs 1.3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.