न्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 08:36 PM2018-01-12T20:36:30+5:302018-01-12T22:49:38+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

Justice Rahul Gandhi should be properly examined by Loya | न्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी

न्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी

Next

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. लोकशाही धोक्यात असून, वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.

चार न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. यावर योग्य विचार होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही घडल्या नाहीत. हे एक अभूतपूर्व प्रकरण आहे.  भारताच्या सर्व नागरिकांचं न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे, न्यायाधीशांच्या प्रश्नांचं लवकरच निराकरण व्हायला हवं. न्या. लोया मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी व्हावी, तसेच हे प्रकरण न्यायमूर्तींनी योग्य प्रकारे हाताळण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे. 

न्यायाधीशांच्या वादाचा लोकशाहीवर होणार परिणाम- सुरजेवाला
काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनीही न्यायाधीशांच्या वादामुळे काँग्रेस अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. याचे लोकशाहीवर दूरगामी परिणाम होतीत. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवरही न्यायाधीशांनी सवाल उपस्थित केले आहेत, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि पी. चिदंबरम सहभागी झाले होते.





दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही
 न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.  
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनंतर दुस-या क्रमांकावर असलेले जे चेलमेश्वर यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं. पहिल्यांदाच न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचं प्रशासन नीट काम करत नाही असं म्हणत त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
आम्ही आमचा आत्मा विकला असं उद्या कोणी म्हणू नये
सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही, कारभार व्यवस्थित चालत नाही.  यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही'' अशा शब्दांमध्ये आज सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कारभारावर हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे. 

Web Title: Justice Rahul Gandhi should be properly examined by Loya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.