पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 06:25 PM2019-01-17T18:25:59+5:302019-01-17T18:57:05+5:30

पत्रकार हत्या प्रकरणी स्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

journalist murder case: Gurmeet Ram Rahim gets life imprisonment | पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

Next
ठळक मुद्देपत्रकार हत्या प्रकरण, स्वयंघोषित गुरू बाबा राम रहीमला जन्मठेपहत्या प्रकरणात राम रहीम प्रमुख आरोपी

नवी दिल्ली - पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी स्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राम रहिमसोबत अन्य तीन दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी 11 जानेवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहीमसहीत कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही कोर्टाने दोषी ठरवले होते. 

(पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहीम दोषी; सीबीआय कोर्टाचा निकाल)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरण 16 वर्ष जुने आहे. 2002 मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. छत्रपती सतत त्यांच्या वृत्तपत्रातून डेरा सच्चा सौदा आणि त्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. यामुळे त्यांनी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास नोव्हेंबर 2003 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. 2007 मध्ये सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. यात राम रहीम मुख्य आरोपी होता. 



 



 

Web Title: journalist murder case: Gurmeet Ram Rahim gets life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.