कर्मचाऱ्याची जीवघेणी चूक! जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 09:26 AM2018-09-20T09:26:30+5:302018-09-20T10:47:26+5:30

जेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता.  

jet airways mumbai jaipur flight turned back to mumbai mid air during climb | कर्मचाऱ्याची जीवघेणी चूक! जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव

कर्मचाऱ्याची जीवघेणी चूक! जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव

googlenewsNext

मुंबई - जेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानानं उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच पुन्हा ते  मुंबईत लँड करावे लागले आहे. कारण, उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या अक्षम्य चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमानामध्ये जवळपास 166 प्रवासी होते. यातील 30 जणांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. यानंतर प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.  

या घटनेची गांभीर्यानं दखल घेत डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याचं निलंबनदेखील करण्यात आले आहे.  









 


 



 



 




 

Web Title: jet airways mumbai jaipur flight turned back to mumbai mid air during climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.