आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू, सदस्यपदी विजय दर्डा, करण दर्डा, शैलेश गुप्ता डेप्युटी प्रेसिडेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:40 AM2018-09-29T05:40:26+5:302018-09-29T05:40:49+5:30

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) २०१८-२०१९ या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली.

 Jayant Mathew as President of INS, Vijay Darda, Karan Darda, Shailesh Gupta, Deputy President, | आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू, सदस्यपदी विजय दर्डा, करण दर्डा, शैलेश गुप्ता डेप्युटी प्रेसिडेंट

आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू, सदस्यपदी विजय दर्डा, करण दर्डा, शैलेश गुप्ता डेप्युटी प्रेसिडेंट

Next

बंगळुरू  - इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) २०१८-२०१९ या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली. शुक्रवारी आयएनएसची येथे ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, तीत मॅथ्यू यांची निवड झाली. मिड-डेचे शैलेश गुप्ता हे डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले. बिझनेस स्टँडर्डच्या श्रीमती अकिला उरणकर या यापूर्वी अध्यक्ष होत्या.
सोसायटीच्या कार्यकारी समितीचे अन्य सदस्य असे- श्री. एस. बालासुब्रमणियम आदित्यन (दैनिक थांथी), श्री. गिरीश अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), श्री. समाहित बाल (प्रगतीवादी), श्री. व्ही. के. चोप्रा (दैनिक आसाम), श्री. विजय कुमार चोप्रा (पंजाबी केसरी, जालंधर), श्री. करण राजेंद्र दर्डा (लोकमत, औरंगाबाद), श्री. विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत, नागपूर), श्री. जगजित सिंग दर्डी (दैनिक चारधिकला), श्री. विवेक गोयंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), श्री. महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), श्री. प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), श्री. संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणसी), श्री. मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स), श्रीमती सरविंदर कौर (अजित), श्री. सी. एच. किरोन (विपुला अँड अन्नदाता), श्री. एम. व्ही. श्रेयम्स कुमार (मातृभूमी आरोग्य मासिका).
डॉ. आर. लक्ष्मीपथी (दिनमलार), श्री. विलास ए. मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), श्री. हर्षा मॅथ्यू (वनिथा), श्री. नरेश मोहन (संडे स्टेटस्मन), श्री. अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), श्री. सुमंता पाल (अमर उजाला), श्री. प्रताप जी. पवार (सकाळ), श्री. डी. डी. पुरकायस्थ (आनंद बझार पत्रिका), श्री. आर. एम. आर. रमेश (दिनकरन), श्री. के. राजा प्रसाद रेड्डी (साक्षी, विशाखापट्टणम), श्री. अतिदेब सरकार (द टेलिग्राफ), श्री. राकेश शर्मा (आज समाज), श्री. किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), श्री. बिजू वर्गीस (साप्ताहिक मंगलम), श्री. राजीव वर्मा (हिंदुस्थान टाइम्स, नवी दिल्ली), श्री. विनय वर्मा (द ट्रिब्यून), श्री. बाहुबली एस. शहा (गुजरात समाचार), श्री. होरमुसजी एन. कामा (साप्ताहिक बाँबे समाचार), श्री. कुंदन आर. व्यास (व्यापार, मुंबई), श्री. के. एन. तिलक कुमार (डेक्कन हेराल्ड अँड प्रजावाणी), श्री. रवींद्र कुमार (द स्टेटस्मन), श्री. किरण बी. वडोदरिया (संभाव मेट्रो), श्री. पी. व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी), श्री. सोमेश शर्मा (साप्ताहिक राष्ट्रदूत), श्रीमती अकिला उरणकर (बिझनेस स्टँडर्ड).

शरद सक्सेना मानद कोषाध्यक्ष

व्हार्ईस प्रेसिडेंटपदी एल. अदिमूलम (हेल्थ अँड द अँटिसेप्टिक) यांची, तर शरद सक्सेना (हिंदुस्थान टाइम्स, पाटणा) यांची मानद कोषाध्यक्षपदी २०१८-२०१९ वर्षासाठी निवड झाली. लव सक्सेना हे आयएनएसचे सरचिटणीस आहेत.
 

Web Title:  Jayant Mathew as President of INS, Vijay Darda, Karan Darda, Shailesh Gupta, Deputy President,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.