'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 10:21am

भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांनी देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान करणार विधान केलं आहे

श्रीनगर- भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांनी देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान करणार विधान केलं आहे.‘सैन्यात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाही’ असं संतापजनक वक्तव्य नेपाल सिंह यांनी केलं आहे. नेपाल सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत असून त्यांनी जवांनाची माफी मागावी अशी मागणी केली गेली. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघाचे नेपाल सिंह खासदार आहेत. नेपाल सिंह यांच्या या वक्तव्यावर टीका होताच त्यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असं त्यांनी म्हंटलं. जवानांचा अपमान होईल, असं कुठलंही विधान मी केलेलं नाही, असंही त्यांनी म्हंटलं. 

 

जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या 185 बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेपाल सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला.यावेळी नेपाल सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. सैन्याचे जवान असल्याने त्यांचा जीव जाणारच. असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. आपल्या विधानाचे समर्थन करताना नेपाल सिंह यांनी गल्लीतील भांडणाचं उदाहरण दिलं. गावात जेव्हा भांडणं होतात, त्यावेळीही मारामारीत किमान एक तरी व्यक्ती जखमी होतेच, असंही ते म्हणाले. 

 

यानंतर नेपाल सिंह यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला. मला तुम्ही असे डिव्हाईस दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. नेपालसिंह यांनी जवानांविषयी केलेल्या या विधानामुळे सगळीकडूनच नाराजी व्यक्त केली जाते आहे. 

 

दरम्यान, नेपाल सिंह यांच्या या वक्तव्यावर टीका होताच नेपाल सिंह यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असं त्यांनी म्हंटलं. जवानांचा अपमान होईल, असं कुठलंही विधान मी केलेलं नाही. मी केलेल्या विधानाचं मला दुःख आहे त्यासाठी मी माफी मागतो पण जवानांचा अपमान होईल, असं मी काहीही बोललो नाही. वैज्ञानिक डिव्हाइस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत ज्यामुळे गोळी येऊन पण लागणार नाही, सैनिकांचं संरक्षण होईल, असं मी म्हंटलं होतं अशी सारवासारव भाजपा खासदार नेपाल सिंह यांनी केली.  

संबंधित

भाजपाचा गृहप्रकल्पावरून यू-टर्न, पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडीचा मागविला फेरप्रस्ताव
... म्हणून राज ठाकरे यांची पुण्यात पायपीट
No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार
कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'
मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय कडून आणखी

जलदगती न्यायालयांच्या स्थापनेत महाराष्ट्र दुसरा!
न्यायालयीन खटल्यांवरील खर्चात ३०० टक्के वाढ, संसदेसमोर आली चार वर्षांतील आकडेवारी
मी भय, विद्वेष पसरवतो, ओळखा पाहू मी कोण?- राहुल गांधी
पाचवी आणि आठवीच्याही होणार परीक्षा
हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती

आणखी वाचा