स्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 08:42 AM2018-02-18T08:42:01+5:302018-02-18T08:49:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपाचे सर्व खासदार जरी गंभीर दिसत नसले तरी...

Janardan mishra bjp mp cleans toilet himself at a school in rewa madhya pradesh | स्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य

स्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य

Next

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपाचे सर्व खासदार जरी गंभीर दिसत नसले तरी मध्य प्रदेशच्या रीवा येथील लोकसभा खासदार  जनार्दन मिश्रा  यांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कोतूक होत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन मिश्रा रीवा येथील भुशुड़ी ग्रामपंचायतीच्या दो-यावर होते. तेथील प्राथमिक सरकारी शाळेत पोहोचल्यावर त्यांची नजर शोचालयावर गेली. माती भरल्यामुळे शैचालय ब्लॉक झालं होतं. ते पाहताच खासदार महोशयांनी स्वतःच्या हातांनीच शौचालय साफ कऱण्यास सुरूवात केली. या दरम्यान ते कोणत्याही शिक्षकावर किंवा मुख्याध्यापकांवर संतापले नाहीत अथवा कोणता आदेशही त्यांनी काढला नाही. याउलट त्यांनी स्वतःच हाताने शौचालयात भरलेली माती बाहेर काढण्यास सुरूवात केली. ते शौचालय साफ करत असताना त्यांचा एक व्हिडीओ शूट कऱण्यात आला. नंतर त्यांनी ट्विटरद्वारे व्हिडीओ हा शेअर केला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुशुड़ी ग्रम पंचायतीतील प्राथमिक शाळेच्या शौचालयाची सफाई केली असं ट्विट त्यांनी केलं आणि हा व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरूवात झाली.  त्यानंतर भाजपा खासदाराच्या या कार्याचं सर्वत्र कौतूक होत आहे.  



 

Web Title: Janardan mishra bjp mp cleans toilet himself at a school in rewa madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.