तुमचं जन-धन खातं आहे?... 15 ऑगस्टला मिळू शकते मोठी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 01:44 PM2018-08-12T13:44:23+5:302018-08-12T13:47:09+5:30

बँकेची पायरीही न चढलेल्या गाव-खेड्यातील गरीब-दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या मुख्य उद्देशानं सुरू झालेल्या 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ला येत्या स्वातंत्र्यदिनी - 15 ऑगस्टला चार वर्षं पूर्ण होणार आहेत.

jan dhan account holders may get some gift from pm narendra modi on independence day | तुमचं जन-धन खातं आहे?... 15 ऑगस्टला मिळू शकते मोठी भेट

तुमचं जन-धन खातं आहे?... 15 ऑगस्टला मिळू शकते मोठी भेट

Next

नवी दिल्लीः बँकेची पायरीही न चढलेल्या गाव-खेड्यातील गरीब-दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या मुख्य उद्देशानं सुरू झालेल्या 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ला येत्या स्वातंत्र्यदिनी - 15 ऑगस्टला चार वर्षं पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने, जन-धन खातेधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून काहीतरी मोठी भेट देऊ शकतात, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. 

जन-धन खातं सहा महिने योग्य प्रकारे चालू राहिल्यास खातेदाराला बँकेकडून 5 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. ही मर्यादा वाढवून थेट दुप्पट - म्हणजेच 10 हजार रुपये करण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबतच, पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. रुपे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवण्याचा विचारही सरकार करतंय, असं सूत्रांनी सांगितलं.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाची मर्यादा 5 हजार रुपयांवरून दहा हजार रुपये होऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी 'सव्वा सौ करोड' देशवासीयांसाठी महत्त्वाकांक्षी जन-धन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, 28 ऑगस्टला ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली होती. जन-धन खातं कुठलाही भारतीय नागरिक उघडू शकतो. परंतु, गरीब, दुर्बल घटकांना सरकारी योजनांद्वारे मिळणारी रक्कम थेट त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा हा या योजनेचा मुख्य हेतू होता. गेल्या चार वर्षांत 32 कोटी 25 लाख जन-धन खाती उघडण्यात आली असून त्यात 80 हजार 674 कोटी रुपये जमा आहेत.

Web Title: jan dhan account holders may get some gift from pm narendra modi on independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.