Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 10:32 AM2019-06-30T10:32:07+5:302019-06-30T10:37:32+5:30

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

JammuAndKashmir One terrorist has been killed in Budgam encounter, operation continues | Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (30 जून) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.


जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार स्थानिक अतिरेकी ठार झाले होते. दारमदोरा भागात काही अतिरेकी लपलेल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या भागाची घेराबंदी केली व शोधसत्र हाती घेतले. याच वेळी त्या ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. यात चार अतिरेकी ठार झाले. लष्कर व पोलिसांनी सांगितले की, ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे. रफी हसन मीर, सुहेल अहमद भट, शौकत अहमद मीर आणि आजाद अहमद खांडे, अशी ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. 


जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (11 जून) पहाटेपासून चकमक होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तर पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (7 जून) झालेल्या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपोरा भागात चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. 


शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात 31 मे रोजी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (29 मे) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. रमजानचा महिना सुरू असल्याने दहशतवाद्यांनी तसेच लष्करानेही कारवाया करू नयेत असे आवाहन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. 

 

Web Title: JammuAndKashmir One terrorist has been killed in Budgam encounter, operation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.