Jammu Kashmir : soldiers arrested three terrorist in Kupwada | Jammu Kashmir : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले तीन दहशतवादी अटकेत
Jammu Kashmir : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले तीन दहशतवादी अटकेत

 श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये सीमेपलीकडून होणारा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. कुपवाडामधील करना येथे घुसखोरी करून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने प्राथमिक चौकशीनंतर या तिन्ही दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. हे दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी असून, प्रशिक्षण घेण्यासाठी ते पाकिस्तानमध्ये गेले होते.  


Web Title: Jammu Kashmir : soldiers arrested three terrorist in Kupwada
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.