जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 11:29 AM2018-12-09T11:29:34+5:302018-12-09T11:40:35+5:30

श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. भारतीय जवानांना एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यामध्ये मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे.

jammu kashmir securuty forces terrorist encounter mujgund mudasir killed | जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे.मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे. गेल्या आठवड्यातच हातात एके-47 घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

श्रीनगर : श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. भारतीय जवानांना एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यामध्ये मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे. गेल्या आठवड्यातच हातात एके-47 घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चकमकीवेळी पाच जवान जखमी झाले आहेत. चकमकीवेळी दहशतवादी लपलेल्या घराला आग लागली. या घरासह चार घरे नेस्तनाभूत झाली आहेत. 

मुदासीर हा हाजिन बांदीपोरा येथील रहिवासी असून 31 ऑगस्टपासून त्याचा मित्र बिलालसोबत घरातून गायब होता. इयत्ता 9 वी पर्यंत शिकलेला मुदासीर लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मुदासीरला परत घरी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड प्रयत्न केले होते. मात्र त्याने घरी येण्यास नकार दिला होता. मुदासिर आणि बिलाल दोघेही पाच महिन्यांपासून गायब होते. 



मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता लाल चौकापासून 15 किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसराला घेराव घातला. यावेळी चाललेल्या शोधावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर जोरदार गोळाबार करण्यात आला.



दहशतवादी शेख हमजा शाळेजवळील एका घरामध्ये लपले होते. या गोळीबारात सीआरपीएफ आणि पोलिसांचे दोन जवान जखमी झाले. यानंतर एका तासाच्या चकमकीनंतर एका दहशतवाद्याला मारण्यात यश आले. नंतरच्या तासाभरात आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ही चकमक आजही सुरुच असून खबरदारी म्हणून इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. 



मुजगुंडमध्ये चकमकीची बातमी पसरताच एचएमटी, पंरपोरा, मलूरा, लावेपोरा आणि अन्य भागांमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी रस्त्यावर उतरत दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी या युवकांनी भारत विरोधी आणि जिहादी घोषणा दिल्या. सुरक्षादलांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमारही केला. पॅलेट गनच्या माऱ्यात 5 आंदोलक जखमी झाले आहेत.

Web Title: jammu kashmir securuty forces terrorist encounter mujgund mudasir killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.