Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट सुरू! 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:58 PM2018-09-24T15:58:14+5:302018-09-24T16:32:17+5:30

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.

jammu kashmir 3 more terrorists killed after an infiltration bid was foiled by security forces in kupwara tangdhar sector | Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट सुरू! 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट सुरू! 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Next

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी (23 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. तर सोमवारी आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. आतापर्यंत गेल्या 24 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुपवाडा येथील चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे. 


कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे रविवारी सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. सोमवारी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या आणखी  तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रविवारपासून आत्तापर्यंत या भागात सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.

Web Title: jammu kashmir 3 more terrorists killed after an infiltration bid was foiled by security forces in kupwara tangdhar sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.