जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:58 AM2019-07-01T09:58:31+5:302019-07-01T11:42:14+5:30

प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Jammu and Kashmir matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge 10 died 7 injured | जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

Next

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये बसला झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 




केशवानहून किश्तवाडला जाणाऱ्या बसला सिरग्वारीमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावरुन घसरल्यानं झालेल्या या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. 

Web Title: Jammu and Kashmir matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge 10 died 7 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.