'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:55 PM2019-03-04T12:55:41+5:302019-03-04T13:04:27+5:30

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले.

'It is not our job to count the number of terrorist fights, but we just do it' , Air Chief Marshal BS Dhanoa | 'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो'

'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो'

Next

कोईम्बतूर - भारतीय वायू सेनेचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला आहे. भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच हा राजकीय मुद्दाही बनत चालला होता. त्या पार्श्वभूमीवर वायू सेनेकडून प्रथमच अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणं आमचं काम नाही, असे धनुआ यांनी स्पष्ट केलं आहे.

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात यावरुन राजकारण सुरू झाले होते. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलिही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय वायू सेनेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्ही फक्त आमचं टार्गेट साधतो, आणि त्यावर मारा करतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जिवीतहानी झाली, हे मोजणे आमचं काम नाही, ते सरकार पाहिल, असे वायू सेना प्रमुख बी.ए. धनुआ यांनी म्हटले आहे. तसेच मिग 21 हे विमान सक्षम असे फायटर जेट आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची शस्त्रास्त्र आणि मिसाईल सिस्टीम आहे. देशाकडील सर्वच एअरक्राफ्ट उत्कृष्ट दर्जाची असल्याचेही धनुआ यांनी म्हटले. 


दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. 'पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राईक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला' असे अमित शहा यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये रविवारी (3 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटले. त्यानंतर, कोईम्बतूर येथे सोमवारी एअर मार्शल धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्यासंदर्भात खुलासा केला. 



 

Web Title: 'It is not our job to count the number of terrorist fights, but we just do it' , Air Chief Marshal BS Dhanoa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.