गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावून इस्लामिक बँकरने गाठलं दुबई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:04 AM2019-06-14T11:04:28+5:302019-06-14T13:18:56+5:30

मसूर खानची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Islamic Banker Mohammed Mansoor Khan fled to Dubai, say cops | गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावून इस्लामिक बँकरने गाठलं दुबई

गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावून इस्लामिक बँकरने गाठलं दुबई

Next

बंगळुरु - आय मॉनेटरी एडवायझरी(IMA) नावाने इस्लामिक कंपनी चालविणारा मोहम्मद मसूर खान लोकांना फसवणूक परदेशात फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून मसूर खान यांनी लोकांकडून पैसे लाटले होते. काही दिवसांपूर्वी मसूर खानने सरकारी अधिकाऱ्यांना धमकाविण्यासाठी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. 

मोहम्मद मसूर खानने मुस्लिम समुदायाला टार्गेट करुन लोकांकडून 1500 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार मसूर खानविरोधात पहिली तक्रार होण्याआधीच तो पळाला असल्याची माहिती आहे. बंगळुरु शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. मसूरविरोधात पहिली तक्रार त्याचा मित्र आणि भागीदार खालिद अहमद याने केली होती. मसूर खानवर साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार खालिद यांनी केली होती. त्यानंतर मसूर खानची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाली. त्यात आत्महत्या करण्याची धमकी मसूर खानने दिली होती. या ऑडिओ क्लीपनंतर मसूर विरोधात लोकांनी तक्रारी केल्या होत्या. 

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पहिली तक्रार प्राप्त झाल्यानंतर मसूर खान दुबईसाठी रवाना झाला. आयएमएच्या सात संचालकांना अटक केली असून खान याची कार जप्त करण्यात आली आहे. मसूर खानची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 2006 मध्ये आयएमए या गुंतवणूक कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून लोकांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करुन 14 ते 18 टक्के रिटर्न देण्याचं आमिष दाखविण्यात आलं होतं. लोकांनीही योजनेला बळी पडत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती.  

सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप

मसूर विरोधात आत्तापर्यत 20 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच व्हायरल झालेल्या मसूर खानच्या ऑडिओ क्लीपमध्ये शिवाजीनगरचे काँग्रेस आमदार रोशन बेग यांच्यावर 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तर, याप्रकरणी सरकारने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रोशन बेग यांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम लोकांनी कोणाच्याही पाठीमागून जावू नये. तर लोक माझ्या पाठिमागे लागले. मी एसआयटीच्या चौकशीचे स्वागत करतो. जीएससी आणि इतर कायदे असताना 400 कोटी रुपये कोण, कशाला देईल असं सांगितले.

Web Title: Islamic Banker Mohammed Mansoor Khan fled to Dubai, say cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.