तर 12 रुपये अतिरिक्त भूर्दंड पडणार, रेल्वेचे ऑनलाईन तिकीट महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:41 AM2018-07-23T11:41:34+5:302018-07-23T11:44:18+5:30

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. पण,

IRCTC will charge online tickets, additional cost of Rs 12 | तर 12 रुपये अतिरिक्त भूर्दंड पडणार, रेल्वेचे ऑनलाईन तिकीट महागले

तर 12 रुपये अतिरिक्त भूर्दंड पडणार, रेल्वेचे ऑनलाईन तिकीट महागले

नवी दिल्ली - रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. पण, जर तुम्ही मेक माय ट्रीप, पेटीएम किंवा तत्सम पोर्टल वा अॅप्सवरुन रेल्वे तिकीट बुकींग करत असल्यास तुम्हाला हा चार्ज भरावा लागणार आहे. पेटीएमसारख्या कंपन्यांना 12 रुपये कर अदा केल्यानंतरच रेल्वे तिकीट बुकींगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. 

आयआरसीटीसीद्वारे रेल्वे तिकीट बुकींग करण्यात येते. मात्र, आयआरसीटीसी हा रेल्वे विभागाचाच एक भाग आहे. त्यामुळे यापूर्वी आयआरसीटीसी अशा कंपनींकडून वर्षाला ठराविक रक्कम घेत होती. मात्र, आता आयआरसीटीसीचा आयपीओ क्रमांक येणार आहे. त्यामुळेच या कंपन्यांकडून एका तिकीट बुकींगसाठी 12 रुपये अतिरिक्त रक्कम घेण्यात येईल. पण, रेल्वेच्या या नव्या नियमामुळे मेक माय ट्रीप किंवा तत्सम कंपन्या नाराज झाल्या आहेत. तसेच या अतिरिक्त 12 रुपयांच्या शुल्कमुळे आम्ही आयआरटीसीच्या स्पर्धेत टीकणार नसल्याची खंतही कंपन्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, जर प्रवाशांना या अतिरिक्त रकमेपासून सुटका हवी असल्यास प्रवाशांनी आयआरटीसीच्या वेबसाईटवरुन तिकिटांचे बुकींग करावे. तसेच रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटवर जाऊनही तिकीटाचे बुकींग करता येऊ शकते. 

Web Title: IRCTC will charge online tickets, additional cost of Rs 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.