'आयआरसीटीसी'नं सहा बँकेच्या कार्डवर घातली बंदी, फक्त या कार्डद्वारे तूम्ही करु शकता ऑनलाइन तिकीट बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:23 PM2017-09-22T21:23:10+5:302017-09-22T21:23:50+5:30

बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे.   'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही.

'IRCTC' s ban on six bank cards, just by this card you can do online ticket booking | 'आयआरसीटीसी'नं सहा बँकेच्या कार्डवर घातली बंदी, फक्त या कार्डद्वारे तूम्ही करु शकता ऑनलाइन तिकीट बुकिंग

'आयआरसीटीसी'नं सहा बँकेच्या कार्डवर घातली बंदी, फक्त या कार्डद्वारे तूम्ही करु शकता ऑनलाइन तिकीट बुकिंग

Next

नवी दिल्ली, दि. 22 - बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे.   'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही. यावर त्या बँका म्हणाल्या की,  'आयआरसीटीसी'चा सुविधा शुल्क पुर्णपणे आपल्याकडेच ठेवण्याचा विचार होता. त्याला आम्ही विरोध केला. म्हणून त्यांनी आमच्यावर बंदी घातली आहे. 
इंडियन ओवरसीज बँक, कॅनरा बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँक यांच्या कार्डनेच 'आयआरसीटीसी'चे पेमेंट करु शकता. याशिवाय कोणत्याही बँकच्या कार्डद्वारे तूम्ही ऑनलाइन तिकीट बुकिंग करु शकणार नाही.  'आयआरसीटीसी'नं  यावर्षाच्या सुरुवातीला बँकाना सांगितल होत की, वेबसाइटद्वारा होणाऱ्या ट्रांजेक्शनमधून मिळणाऱ्या सुविधा शुल्कातील काही भाग आम्हाला द्या. त्यानंतर बँका, भारतीय रेल्वे आणि 'आयआरसीटीसी' यांच्यामध्ये यावर चर्चा झाली. हे प्रकरण मिटेल असे वाटले होतं पण तसं काही झालं नाही. 
नोटाबंदीनंतर  'आयआरसीटीसी'नं सुविधा शुल्क 20 रुपयांनी कमी केलं होतं. एसबीआयच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्यानं सांगितले की, आमचे दिवसाला 50000 ट्रांजेक्शन कमी होत आहेत. नफ्यातील पैसा  'आयआरसीटीसी'नं आम्हाला दिलेला नाही.  त्यामुळे आम्ही ते पैसे ग्राहकाकडून वसूल करतो. 
भविष्यामध्ये 100 रुपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटसाठी 0.25 टक्के, 2000 रुपयांच्या पेमेंटसाठी 0.5 टक्के आणि त्यापेक्षा आधिकच्या व्यवहाराठी एक टक्का एमडीआर घेण्याची परवानगी दिली आहे. 

 

तात्काळ तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल; ‘ही’ आहे नवी पद्धत

‘आयआरसीटीसी’ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पर्यायाचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाही करता येईल. यामुळे तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतर पैसे भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. ‘ईपेलेटर’च्या (ePaylater) माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येणार आहे. रेल्वेत दररोज तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी १ लाख ३० हजार व्यवहार केले जातात. तात्काळ तिकीटाचा कोटा सुरु होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये हे व्यवहार होतात. एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरु होते. तर नॉन एसीसाठीचे तात्काळ तिकीटांचे आरक्षण ११ वाजता सुरु होते. प्रवासाच्या एक दिवसआधी तात्काळ तिकीटांचे बुकिंग सुरु होते. तात्काळ तिकिटाच्या बुकिंगवर कोणतीही सवलत दिली जात नाही. मात्र आता तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना ‘ईपेलेटर’मुळे पेमेंट करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळेल. याशिवाय ‘पे ऑन डिलेव्हरी’चा पर्यायदेखील उपलब्ध होईल. ‘ईपेलेटर’ सुविधेमुळे तिकीट आरक्षित केल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत पेमेंट करता येईल. 

Web Title: 'IRCTC' s ban on six bank cards, just by this card you can do online ticket booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.