आयपीएलमुळे मालिका मुकल्याने मुलीची आत्महत्या

By admin | Published: May 8, 2014 04:15 PM2014-05-08T16:15:06+5:302014-05-08T17:14:18+5:30

आयपीएलमुळे मालिका बघता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन भोपाळमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

IPL Women's Suicide | आयपीएलमुळे मालिका मुकल्याने मुलीची आत्महत्या

आयपीएलमुळे मालिका मुकल्याने मुलीची आत्महत्या

Next


ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. ८ - आयपीएलमुळे मालिका बघता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन भोपाळमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयपीएलवरुन त्या मुलीचे भावासोबत भांडण झाले व यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. 
भोपाळमध्ये राहणारी १४ वर्षीय प्रेरणा ही नववी इयत्तेत शिकत होती. सध्या आयपीएल सुरु असल्याने प्रेरणाचा लहान भाऊ दररोज संध्याकाळी आयपीएलमधील सामने बघतो. मंगळवारी संध्याकाळी संगीता तिच्या मालिका पाहत बसली होती. मात्र काही वेळाने तिचा भाऊ घरी आला व त्याने आयपीएलचा सामना सुरु केला. यावरुन संगीताने भावाशी वाद झाला. काही वेळाने संगीत आतच्या खोलीत गेली व तिने ओढणीद्वारे गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला संगीता बाहेर येत नसल्याने तिच्या आईने बेडरुमचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: IPL Women's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.