आयपीएल, निवडणुकीमुळे चित्रपट खेळांचे वाजले बारा

By admin | Published: May 14, 2014 01:31 AM2014-05-14T01:31:27+5:302014-05-14T01:31:27+5:30

नाशिक : आयपीएलमधील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीचा चढलेला फिव्हर यामुळे शहरातील चित्रपटगृहे ओस पडली असून, चित्रपट निर्मात्यांनीही या कालावधीत बिगबजेट चित्रपट प्रदर्शित न करण्याचा व्यवहारीपणा दाखविला आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या खेळांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने थिएटर्समालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

IPL matches, 12 games due to elections | आयपीएल, निवडणुकीमुळे चित्रपट खेळांचे वाजले बारा

आयपीएल, निवडणुकीमुळे चित्रपट खेळांचे वाजले बारा

Next
शिक : आयपीएलमधील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीचा चढलेला फिव्हर यामुळे शहरातील चित्रपटगृहे ओस पडली असून, चित्रपट निर्मात्यांनीही या कालावधीत बिगबजेट चित्रपट प्रदर्शित न करण्याचा व्यवहारीपणा दाखविला आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या खेळांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने थिएटर्समालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सध्या आयपीएलचा धमाका सुरू आहे. दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार्‍या क्रिकेट सामन्यांमुळे प्रेक्षकवर्ग सध्या छोट्या पडद्याला चिकटून बसत आहे. त्यातच स्पर्धेत चुरस वाढीस लागल्याने प्रेक्षकांची उत्कंठा प्रत्येक सामन्यागणिक वाढतच चालली आहे. विशेषत: मुंबई इंडियन्सने पहिल्या पाच सामन्यांत हार पत्करल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये विजयाची मालिका सुरू ठेवल्याने मुंबई इंडियन्सच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएलचा धमाका सुरू असतानाच देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. एक्झिट पोलने मोदी लाट मान्य केल्यानंतर देशाची कमान कोणाच्या हाती सोपविली जाते, याचे गुपित येत्या शुक्रवारी मतमोजणीनंतर उघड होणार आहे. वृत्तवाहिन्यांवरही चोवीस तास निवडणूकविषयक विश्लेषणाचा मारा सुरू असल्याने नागरिकांचा ठिय्या छोट्या पडद्यासमोर पडला आहे. आयपीएल आणि निवडणूक याचा परिणाम चित्रपटांच्या खेळांवर जाणवत असून, चित्रपटगृहांना प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. सध्या शहरातील मल्टीप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हवाहवाई वगळता अन्य चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.
इन्फो
हिंदीवाले हुश्शार...
आयपीएल आणि लोकसभा निवडणुकीचे वातावरण पाहता गेल्या दोन महिन्यांत प्रदर्शनापूर्वीच गाजलेला एकही बिगबजेट हिंदी चित्रपट थिएटर्सवर झळकलेला नाही. नाशिक शहरातील चित्रपटगृहांमध्ये सध्या हवाहवाई, ये है बराकपूर, कोयलांचल हे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याउलट प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची संख्या जास्त आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये एक हजाराची नोट, सलाम, दुसरी गोष्ट, वात्सल्य, आजोबा, भाकरवाडी ७ कि.मी. हे मराठी चित्रपट झळकले आहेत. हिंदी चित्रपट नसल्याने मल्टिप्लेक्समध्येही मराठी चित्रपटांना त्यामुळे आपसूकच स्थान मिळाले आहे.

Web Title: IPL matches, 12 games due to elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.