INX Media case: पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा, 3 जुलैपर्यंत अटक करण्यास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 01:00 PM2018-05-31T13:00:50+5:302018-05-31T13:00:50+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने पी. चिदंबरम यांना अटक करण्यास 3 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

INX Media Case: P Chidambaram gets protection from CBI arrest till July 3 | INX Media case: पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा, 3 जुलैपर्यंत अटक करण्यास स्थगिती

INX Media case: पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा, 3 जुलैपर्यंत अटक करण्यास स्थगिती

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने पी. चिदंबरम यांना अटक करण्यास 3 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान, पी. चिदंबरम यांनी काल एअरसेल मॅक्सीस प्रकरणी अटक टाळण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सीस खटल्यात पी. चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला आहे.  




एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार 3,500 कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात 305 कोटी रुपयांचा संबंध आहे. पी. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (युपीए-1) अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (एफआयपीबी) हिरवा कंदील वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता व त्याचवेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे पी. चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.

Web Title: INX Media Case: P Chidambaram gets protection from CBI arrest till July 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.