भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:39 AM2019-06-14T07:39:43+5:302019-06-14T07:40:05+5:30

पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर अंतराळ स्थानक : ‘गगनयान’नंतर ‘इस्रो’ लागणार कामाला

India's next ambition is the bottom of its own space! | भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!

भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!

Next

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना असून यानाने पहिला अंतराळवीर अंतरिक्षात पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम आॅगस्ट २०२२ मध्ये पार पाडल्यानंतर अंतराळतळाची योजना राबविण्याची तयारी जोमाने सुरू केली जाईल, असे भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी गुरुवारी सांगितले.

‘गगनयन’ मोहीम पार पडल्यानंतर अंतराळ तळ उभारणीच्या योजनेचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला जाईल. अंतराळात अल्प गुरुत्वाकर्षणात नानाविध प्रयोग करण्यासाठी आपलाही स्वतंत्र अंतराळ तळ असावा, ही भारताची महत्त्वाकांक्षा आहे. तिला मूर्त रूप देण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातील.
या प्रस्तावित अंतराळ तळाचा प्राथमिक तपशील देताना डॉ. शिवन म्हणाले की, हा कायमस्वरूपी तळ २० टन वजनाचे ‘मॉड्युल’ असेल अशी कल्पना आहे.
पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर अंतराळ स्थानक असेल. तेथे अंतराळवीरांना सलग १५ ते २० दिवसांचा मुक्काम करण्याची सोय असेल.
अंतराळ संशोधन खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘गगनयान’च्या प्रगतीची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी या मोहिमेसाठी १० हजार कोटींच्या मंजुरी दिली होती.
पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत किंवा त्याआधीही ही मोहीम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे ते
म्हणाले.

‘गगनयान’चे ठोबळ स्वरूप
च्‘इस्रो’च्या ‘जीएसएलव्ही-मार्क ३’ अग्निबाणाने उड्डाण
च्२ किंवा ३ अंतराळवीरांची अंतराळ वारी
च्त्यांचा सात दिवस अंतराळत मुक्काम
च्यान पृथ्वीच्या कक्षेत ३०० ते ४०० किमी उंचीवरून घिरट्या घालेल.

च्‘गगनयान’ साठी संभाव्य दोन-तीन अंतराळवीरांच्या निवडीचे सहा महिन्यांत सुरू होईल. त्यांना एक ते दीड वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. च्सुरुवातीचे प्रशिक्षण भारतात तर प्रगत प्रशिक्षण परदेशात होईल.

च्या मोहिमेसाठी विविध संस्था व उद्योगांचे प्रतिनिधित्व असलेली ‘राष्ट्रीय गगनयान सल्लागार परिषद’ स्थापन करण्यात आली आहे.

च्अंतराळात माणूस पाठविण्याची स्वत:ची मोहीम राबविली तरी चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या आंतररराष्ट्रीय चमूंमध्ये भारताचा सहभाग सुरूच राहणार आहे.

Web Title: India's next ambition is the bottom of its own space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.