भारताचे ड्रोन चुकून घुसले चीनच्या हद्दीत , चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 3:04am

भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली. त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले.

नवी दिल्ली : भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली. त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले. या घटनेमागचे नेमके कारण काय आहे याचा तपास करण्यात येत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, रशिया-भारत-चीन यांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी चीनचे विदेश मंत्री वांग री को हे ११ डिसेंबर रोजी भारतात येत आहेत. अशा काळात ही घटना घडली आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, नियमित सराव करत असताना एक मानवरहित विमानाचा (ड्रोन) संपर्क तुटला आणि हे विमान सिक्कीममधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून पलीकडे गेले. हवाई हद्दीत घुसले ड्रोन बीजिंग : आमच्या हवाई हद्दीत भारताचे ड्रोन अनधिकृतपणे घुसल्याचा आरोप चीनने केला आहे. हे ड्रोन नंतर सिक्कीम क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावाही चीनने केला आहे. याबाबत आम्ही विरोध नोंदविला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.

संबंधित

प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा
मोदींचं तेल उत्पादकांना साकडं, रुपयाला आधार देण्यासाठी हवी मदत
APJ Abdul Kalam Birth Anniversary : एक बुटांचा जोड, 6 शर्ट... एवढीच होती अब्दुल कलामांची संपत्ती!
APJ Abdul Kalam Birth Anniversary : स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रेरणा देणाऱ्या 'मिसाइल मॅन'चे प्रेरणादायी विचार!
APJ Abdul Kalam Birth Anniversary : अब्दुल कलाम यांच्याबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

राष्ट्रीय कडून आणखी

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन 
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर फडकवणार तिरंगा
अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं 
...तर अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवा- असदुद्दीन ओवैसी
भाजपा प्रवेशासाठी काँग्रेस आमदाराला 10 कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर, ऑडिओ क्लिपने खळबळ

आणखी वाचा