भारतीय तरुण कॅनडात होत आहेत स्थायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:28 AM2019-07-10T05:28:44+5:302019-07-10T05:28:55+5:30

अमेरिकेत व्हिसाच्या अडचणी : ३९ हजार युवकांनी मिळविले नागरिकत्व

Indian youth are settled in Canada | भारतीय तरुण कॅनडात होत आहेत स्थायिक

भारतीय तरुण कॅनडात होत आहेत स्थायिक

googlenewsNext

नवी दिल्ली : अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे अनेक भारतीय आता कॅनडामध्ये स्थायिक होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेच्या शेजारीच असलेल्या कॅनडामध्ये नोकरीसाठी जाणाºया भारतीयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.


२०१८ मध्ये तब्बल ३९ हजार ५०० भारतीयांनी कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. जगभरातील तरुणही आता कॅनडामध्येच स्थायिक होत असून, गेल्या वर्षी ९२ हजार लोकांनी त्या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. हे प्रमाण आधीच्या वर्षीच्या म्हणजे २०१७ च्या तुलनेत ४१ टक्क्यांनी अधिक आहे. कॅनडाने उच्चशिक्षित तरुणांनी तिथे यावे, यासाठी पायघड्याच घातल्या आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
जगातील ६५ हजार ५०० जणांनी २०१७ साली कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यात भारतीयांचे प्रमाणही मोठे होते; पण २०१८ साली ते प्रमाण ५१ टक्क्यांनी वाढले. चीन व नायजेरियातूनही असंख्य तरुण कॅनडामध्ये रोजगारासाठी जात आहेत.


अमेरिकेत गेल्या दोन वर्षांत एच१-बी व्हिसा मिळवण्यात असंख्य अडचणी येत आहेत. व्हिसा मिळणे खूपच दुरापास्त झाले असून, तो मिळण्यास विलंब होतो. तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवार असते. तो न मिळाल्यास आयत्या वेळी देश सोडण्याची वेळ येते. तसेच ग्रीन कार्डचा बॅकलॉगही मोठा आहे. दाम्पत्यापैकी एकाला ग्रीन कार्ड असेल तरी त्यांच्यातील दुसºयाला ते मिळण्याची खात्री नसते. त्यामुळे तणावाखाली राहण्यापेक्षा कॅनडामध्ये जाणे सोयीस्कर वाटते, असे अनेक भारतीयांचे म्हणणे आहे.

ट्रेंड वाढत जाणार
अनेक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जातात. त्यांच्यापैकी बहुतांशी जणांना नंतर तिथेच नोकºया मिळतात वा मिळू शकतात; पण त्या मिळूनही व्हिसाची खात्री नसते.
त्यामुळे शेजारीच असलेला कॅनडा देश अनेकांना सोयीचा वाटतो. त्यामुळे कॅनडात जाण्याचा ट्रेंड वाढत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Indian youth are settled in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.