भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह; पृथ्वीपासून ६00 प्रकाशवर्षे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:27 AM2018-06-09T06:27:33+5:302018-06-09T06:27:33+5:30

अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत.अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे.

 Indian scientists discovered new planet; 600 light years away from Earth | भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह; पृथ्वीपासून ६00 प्रकाशवर्षे दूर

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह; पृथ्वीपासून ६00 प्रकाशवर्षे दूर

Next

चेन्नई : अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत.अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे.
हा ग्रह पृथ्वीपासून ६00 प्रकाशवर्षे दूर आहे.
संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या २७ पट असून, ग्रहाची त्रिज्या आहे पृथ्वीच्या सहापट. हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे, असे संशोधकांचे मत पीआरएलच्या संकेतस्थळावरील माहितीत नमूद करण्यात आले आहे.
माऊंट अबूच्या गुरुशिखर येथील १.२ मी दुर्बिण व भारतीय बनावटीच्या पीआरएल अ‍ॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी आॅल स्काय सर्च
(पारस) या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे. (वृत्तसंस्था)

- या शोधामुळे काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक २११९४५२0१ किंवा के२-२३६ असे ठेवले आहे. या ग्रहाचे तापमान खूपच अधिक म्हणजे ६00 अंश सेल्सियस आहे. त्याच्यावर जीवसृष्टी असणे शक्यच नाही.

Web Title:  Indian scientists discovered new planet; 600 light years away from Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chennaiचेन्नई