अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:43 AM2018-06-17T03:43:54+5:302018-06-17T03:43:54+5:30

दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे.

 Indian couple arrested in US | अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक

अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक

Next

हैदराबाद : दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती (३४) व पत्नी चंद्रा (३१) अशी त्यांची नावे आहेत. अमेरिकेमध्ये शोज करण्याच्या बहाण्याने अभिनेत्रींना अमेरिकेत बोलावून त्यांना ते सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याचे उघड झाले आहे.
शिकागोच्या कोर्टात ४२ पानी तक्रार दाखल झाल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात हे जोडपे हा उद्योग करीत असल्याचे उघड झाले. किशन उर्फ श्रीराज पूर्वी दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीत प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यामुळे त्याच्या इथे ओळखी होत्या. या जोडप्याने ११ मे २०१७ ते २२ जानेवारी २०१८ या काळात अनेक मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. ते मुलींना व अभिनेत्रींना अमेरिकेत घेऊन जात व तेथे त्यांना हॉटेलात वा आपल्या घरी 'कैद' करून ठेवत. अमेरिकेतील तेलुगू वा इतर भारतीय भाषिक सोहळ्यांत त्यांना देहविक्रीसाठी घेऊन जात होते, अशी तक्रार होती.
पोलिसांनी या वर्षी १६ फेब्रुवारी या जोडप्याच्या घरी छापा घातला, तिथे एक बॅग सापडली. त्यात गर्भनिरोधके व एक वही होती. वहीत अनेक अभिनेत्रींच्या नावे व त्यांच्या उपलब्ध तारखांची नोंद होती. शिकागो कोर्टाने दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. 
>अभिनेत्रीची तक्रार
सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचवर आवाज उठविणारी अभिनेत्री श्री रेड्डी हिनेही या सेक्स रॅकेट संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. या जोडप्याने माझ्याशीही संपर्क साधला होता. कलाकारांना कामे वा आॅफर्स मिळत नाहीत, तेव्हा ते देहविक्रीच्या उद्योगाकडे वळू शकतात. अमेरिकेत त्यांना १ हजार डॉलर्स (सुमारे ६५ हजार रुपये) इतकी किंमत मिळते. अर्थात हे त्या अभिनेत्रीची लोकप्रियता व तिला मिळालेली प्रसिद्धी यावर अवलंबून असते, असे श्री रेड्डीने म्हटले आहे.

Web Title:  Indian couple arrested in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक