Indian Air Strike on Pakistan: बेक्कार वाट लावली राव; पाकिस्तानवर भारतीयांचा 'व्हॉटसअ‍ॅप स्ट्राईक' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 06:16 PM2019-02-26T18:16:37+5:302019-02-26T18:38:40+5:30

भारतीय वायुसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉटसअ‍ॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Indian Air Strike on Pakistan: funny reactions on whatsapps after Indian Air Strike on Pakistan | Indian Air Strike on Pakistan: बेक्कार वाट लावली राव; पाकिस्तानवर भारतीयांचा 'व्हॉटसअ‍ॅप स्ट्राईक' 

Indian Air Strike on Pakistan: बेक्कार वाट लावली राव; पाकिस्तानवर भारतीयांचा 'व्हॉटसअ‍ॅप स्ट्राईक' 

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानची व्हॉट्सअॅपवर खिल्ली

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारतीय वायुसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉटसअ‍ॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती.  'जैश-ए-मोहम्मद'च्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. 

व्हॉटसअ‍ॅप व्हायरल होणारे मेसेज...

पाकिस्तानचं कस झालं माहिती आहे का... 

मोक्कार अभ्यास केला आर्मीचा... अन पेपर आला " Airforce"  चा 

आउट ऑफ सिलॅबस

------------------------------

5-5 मिनट पर मोबाईल चेक कर रहा हूं...

क्या पता कब बोल दें

मेरे प्यारे भाइयों- बहनों
 और मित्रों...

 पाकिस्तान अब नहीं रहा

------------------------------

इमरान खान ने भी अपनी सेना को दी खुली छूट- 
जिधर चाहो उधर भाग लो🤣🤣🤣

------------------------------
बारा दिवसांनी
बारा विमानांनी
बारा ठिकाणी
बारा वाजवले
आणि तेरावा साजरा केला.
वायू सेनेला सलाम.  🙏🏻🙏🏻

------------------------------

ये cheating है, 
मोदी जी ने खुली छूट Army को दी थी पर हमला Air Force से करवा दिया

------------------------------

बोर्ड परीक्षेच्या मुलांचे विचार
  मोदीजी, जे करायचे ते लौकर करा. 
      पण, भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशात पाकिस्तान दाखवायचा का नाही ?

------------------------------

नुसत्या मिराज ने एवढा कहर केला आहे 
.
.
अजुन तर गाय छाप वाले बाकि आहे 
.
.
.
घे डबल  . .  . लाव चुना . ..

------------------------------

First Indian army now Indian air Force .
.
.
.
Navy wale - Apna time aayega

------------------------------

ये तो अच्छा हुआ कि केवल मिराज ही थे  .... 

यदि विमल और पान पराग होते तो पूरा पाकिस्तान लाल हो जाता.

------------------------------

पहिली विकेट पडलीय...
अजून पूर्ण टीम आउट करायचीय...
सावध रहा...

जल्लोष करा,पण सावध रहा. जर हवाई हल्ला झालाच तर ,सायरन वाजतील,हा धोक्याचा इशारा आहे. जिथे असाल तिथे शेल्टर घ्या. टेबल,बेड किंवा नुसती जमिनीवर लोळण घ्या, डोकं हातांमधे दाबून. 
दाट शक्यता आहे, की पाकिस्तान खूला हल्ला न करता, भारतातील आपले स्लीपर सेल ॲक्टीवेट करील. आपल्याकडे खूप गद्दार गल्लोगल्लीत भरलेले आहेत. सैन्याला सीमा सांभाळू द्या... आपण इथे सतर्क राहूया. आजूबाजूला बारीक लक्ष ठेवा आणि संशय आला तर पोलिसांना कळवा. 
स्वतः रॅम्बो बनायची गरज नाही. जास्त खुश होऊ नका.आत्ताशी पहिली विकेट पडलीय, पूर्ण टीम आऊट करायचीय !!!
म्हणून सावध राहा... खबरदारी घ्या...

------------------------------

पाकिस्तान च कस झालं माहित आहे का अभ्यास केला " आर्मी"चा आणि पेपर आला " Airforce" चा

------------------------------

Web Title: Indian Air Strike on Pakistan: funny reactions on whatsapps after Indian Air Strike on Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.