'दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास भारत तयार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 10:55 AM2019-03-03T10:55:44+5:302019-03-03T11:17:00+5:30

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे.

india is ready to help pakistan to end terrorism rajnath singh | 'दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास भारत तयार'

'दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास भारत तयार'

Next
ठळक मुद्दे'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे.भारताने दहशतवाद्यांना  नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

चंदौली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे. 'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे. पाकिस्तानमधील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा यासाठी आमच्या सरकारने तयारी केली आहे' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

जगभरातले अनेक देश दहशतवादाशी लढत आहेत. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरातील अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली, तर भारत पाकिस्तानाला सहकार्य करेल असंही त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे शनिवारी (2 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधी देखील काही महिन्यांपूर्वी दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे म्हटले होते. अफगाणिस्तानमधील तालिबानींना संपविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेची मदत घेतली होती. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा गंभीर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने भारताशी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले होते.

समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार! 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानदरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागाने समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला रवाना होणारी समझौता एक्सप्रेस आज रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी अटारीला जाणार आहे. त्यानंतर लाहोरला जाणार आहे. तसेच, समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होणार आहे.

Web Title: india is ready to help pakistan to end terrorism rajnath singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.