दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:55 AM2018-07-16T04:55:03+5:302018-07-16T04:55:28+5:30

भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या व्यापक दहशतवादविरोधी सरावात सहभाग घेणार आहेत.

India-Pakistan to participate in anti-terrorism trial | दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक

दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक

Next

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या व्यापक दहशतवादविरोधी सरावात सहभाग घेणार आहेत. शांघाई सहयोगी संघटनेकडून आयोजित या सरावाचे लक्ष्य दहशतवाद आणि कट्टरवादाला रोखण्यासाठी सदस्य देशात सहकार्य वाढविणे हे आहे.
सूत्रांनी सांगितले की, भारताचे २०० सैनिक आणि हवाई दलाचे सैनिक रशियाच्या चेल्याबिस्क शहरात २० ते २९ आॅगस्ट दरम्यान होणाºया सरावात सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानशिवाय या सरावात रशिया, चीन, किर्गीस्तान, कजाखस्तान, तजाकिस्तान आणि उज्बेकिस्तान व सदस्य राष्ट्र सहभागी होतील.
भारत- अमेरिका संयुक्त सराव
भारत आणि अमेरिका तिन्ही दलांचा पहिला सराव यावर्षीच्या अखेरीस करु शकतात असे संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. भारताचे तिन्ही दल अमेरिकेसोबत वेगवेगळे सराव करतात. मात्र, प्रथमच दोन्ही देशांचे तिन्ही दल संयुक्त सराव करणार आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन व अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांच्यात सप्टेंबरमध्ये होणाºया चर्चेत हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

Web Title: India-Pakistan to participate in anti-terrorism trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.