भारतातील या ठिकाणी 5 दिवस आधीच साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:43 PM2018-08-14T18:43:49+5:302018-08-14T18:45:14+5:30

देशाचा 72वा स्वातंत्र्य दिवस आपण उद्या देशभरात साजरा करणार आहोत. पण भारतातील या ठिकाणी पाच दिवस आधीच स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.

Independence day celebration in madhya pradesh temple five days early | भारतातील या ठिकाणी 5 दिवस आधीच साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिवस!

भारतातील या ठिकाणी 5 दिवस आधीच साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिवस!

Next

इंदोर : देशाचा 72वा स्वातंत्र्य दिवस आपण उद्या देशभरात साजरा करणार आहोत.  पण तीन दशकांच्या जुन्या परंपरेनुसार, मध्यप्रदेशच्या मन्दसौर शहरातील प्रसिद्ध  पशुपतिनाथ मंदिरामध्ये स्वातंत्र्य दिवस पाच दिवस आधी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजीच साजरा करण्यात आला. 

इंदोरपासून जवळपास 250 किलोमीटर लांब असणाऱ्या मंदसौरमध्ये शिवना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या, या प्राचीन मंदीरामध्ये स्वातंत्र्य दिवस हिंदू पंचांगानुसार साजरा करण्यात आला. 

पशुपतिनाथ मंदिराचे पुरोहित आणि ज्योतिष व कर्मकांड परिषदेचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी सांगितल्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला त्यावेळी हिंदू पंचांगानुसार, श्रावण मासातील कृष्ण पक्ष चतुर्दशी होती. त्यामुळे पशुपतीनाथ मंदीरामध्ये याच तिथीनुसार पूजा अर्चना करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येतो. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हणून पाच दिवस आगोदर तिथीनुसार स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी देवाची पूजा अर्चना करण्यात आली. तिथीनुसार साजरा करण्याची परंपरा या ठिकाणी 1987 पासून सुरू आहे.
 

Web Title: Independence day celebration in madhya pradesh temple five days early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.