केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:32 AM2018-10-10T11:32:53+5:302018-10-10T11:33:52+5:30

 अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे

Income Tax Department raids 16 locations of Delhi Minister Kailash Gahlot in Delhi and Gurugram | केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे  

केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे  

नवी दिल्ली -  अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. प्राप्तिकर विभागाने गहलोत यांच्याशी संबंधित असलेल्या १६ ठिकाणी छापे मारले आहेत. मात्र आम आदमी पक्षाने ही छापेमारी राजकीय सुडबुद्धीच्या भावनेतून करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. 





प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश अग्रवाल यांच्या दोन कंपन्यांविरोधात असलेल्या करचोरीच्या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली आहे. १६ ठिकाणी करण्यात आलेल्या या छापेमारीमध्ये प्राप्तिकर मिभागाचे ३० अधिकारी सहभागी झाले आहेत. दिल्ली सरकारमध्ये कैलाश गहलोत यांच्याकडे परिवहन, न्याय आणि महसूल मंत्रालयाचा कार्यभार आहे. कैलाश गहलोत यांच्याशी संबंधित दिल्ली आणि गुरुग्राममधील १६ ठिकाणांवर छापे मारले आहेत, असे प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी म्हटले आहे. 





दरम्यान, ही छापेमारी राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने ट्विटरवरून केला आहे. आम्ही दिल्लीमध्ये जनतेला स्वस्त वीज, मोफत पाणी, चांगले शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत आणि ते सीबीआय, इडीच्या माध्यमातून आमच्या घरांवर छापेमारी करत आहेत, असा आरोप आपने केला आहे.  मात्र जनता सर्व पाहत आहे आणि याचा हिशोब २०१९ साली करेल, असेही आपने म्हटले आहे.



 

Web Title: Income Tax Department raids 16 locations of Delhi Minister Kailash Gahlot in Delhi and Gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.